संकेश्वर (महंमद मोमीन) : सुभाष रस्ता येथेच कडधान्याचं व्यापार करुन मी लहानाचा मोठा झालो आहे. आमच्या परिवारातील तिसरी पिढी येथेच व्यापारवृध्दी करणारी राहिली आहे. त्यामुळे मी बाहेरचा उमेदवार असल्याचे सांगणाऱ्यांनी ही गोष्ट प्रथम लक्षात घ्यायला हवी असल्याचे येथील भाजपाचे उमेदवार शिवानंद ऊर्फ नंदू मुडशी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. ते पुढे म्हणाले मी परका मुळीच नाहीय. प्रभाग क्रमांक १३ मधील औरनाळ गल्लीच्या पावलावर माझे निवासस्थान आहे. प्रभाग क्रमांक १३ च्या सर्वांगिण विकासासाठी मी निवडणूक रिंगणात उतरलो आहे. आमचे स्नेही दिवंगत नगरसेवक संजय नष्टी यांच्या समाजसेवेचे कार्य आपण पुढे चालविणार आहोत. मी एक व्यापारी असलो तरी सामाजिक कार्याची आपणाला आवड आहे. त्यामुळे सामाजिक कार्यात आपण नेहमीचा पुढे राहिलो आहे. प्रभाग क्रमांक १३ ची पोटनिवडणूक दिवंगत नगरसेवक संजय नष्टी यांच्या निधनाने होत असल्याने आमचे लाडके नेते राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेशअण्णा कत्ती यांनी समझोता घडवून आणण्याचे कार्य केले पण काॅंग्रेसने ते मान्य केले नाही. त्यामुळे निवडणुकीला सामोरे जावे लागत आहे. प्रभागातील मतदारांच्या आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे. त्यामुळे मतदारांच्या गाठीभेटी कार्यक्रमात आपणाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आमचे लाडके नेते राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेशअण्णा कत्ती, माजी खासदार रमेश अण्णा कत्तीं, उद्योजक अप्पासाहेब शिरकोळी यांचा आशीर्वाद आणि बहुमोल मार्गदर्शन आपणाला लाभले आहे. माजी नगराध्यक्ष श्रीकांत हतनुरी, सभापती सुनिल पर्वतराव, पालिकेतील सत्तारुढ गटाचे सर्व नगरसेवक, प्रभाग १३ मधील जनता जनार्दन आपल्या पाठीशी ठामपणे उभे आहे. आपण पैशाच्या जोरावर निवडणूक लढवित असल्याची अफवा पसरविली जात आहे. मी कांहीं त्यांचा सारखा सावकार नाही. मी एक साधासुधा व्यापारी असल्याचे त्यांनी सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta