
संकेश्वर (प्रतिनिधी) : प्रभाग क्रमांक 13 मधील पोटनिवडणुकीचा प्रचार आता हळूवारपणे जोर धरताना दिसताहे. आज प्रभागात भाजपाचे उमेदवार शिवानंद ऊर्फ नंदू मुडशी यांनी प्रचारात मतदारांच्या गाठीभेटी घेत मतयाचना केली. त्यांनी मतदारांशी संवाद साधताना दिवंगत नगरसेवक संजय नष्टी यांच्या कार्याचा वारसा पुढे चालविण्यासाठी आपणाला आशीर्वाद करा, अशी विणवनी केली. प्रचारात नंदू मुडशी यांचा विजय असो, भारतीय जनता पार्टीचा विजय असो, भारत माता की जय अशा जयघोषणा देण्यात आल्या. प्रचारात माजी नगराध्यक्ष श्रीकांत हतनुरी, प्रविण नष्टी, बेळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक गजानन क्वळी, शंकरराव हेगडे, उपनगराध्यक्ष अजित करजगी, सभापती सुनिल पर्वतराव, नगरसेवक रोहण नेसरी, सचिन भोपळे, अॅड. प्रमोद होसमनी, अॅड. संतोष नेसरी, राजू बांबरे, सिध्दू पट्टणशेट्टी, जयप्रकाश सावंत, रवि शेट्टीमनी, प्रदीप माणगांवी, सागर जकाते कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


Belgaum Varta Belgaum Varta