संकेश्वर (महंमद मोमीन) : चांगलं शिक्षण घेऊन शाळेचे, आई-वडीलांचे नाव मोठे करा, असे एसडीव्हीएस शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष, माजी मंत्री ए. बी. पाटील यांनी सांगितले.
ते एसडीव्हीएस शिक्षण संस्था संचलित अक्कमहादेवी कन्या शाळा व कन्नड माध्यम शाळेच्या प्रारंभोत्सव कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. माजी मंत्री ए. बी. पाटील यांनी नर्सरी, एल.के.जी, यु.के.जी शाळेत दाखल झालेल्या छोट्या मुलांच्या डोक्यावर पुष्पवृष्टी तर कन्या शाळेत प्रवेश घेतलेल्या मुलींना पेन, गुलाबपुष्प देऊन त्यांचे स्वागत केले.
प्रारंभी उपस्थितांचे स्वागत शिक्षक एस. आर. चिनमुरी यांनी केले. ए. बी. पाटील पुढे म्हणाले, मुला-मुलींनी आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी अभ्यास करायला हवा. सरकारने कोरोना काळात मागे पडलेला अभ्यास पूर्ण करुन घेण्यासाठी दि. 16 ते 30 मे 2022 अखेर पंधरा दिवसांचे शैक्षणिक सत्र चालू केले आहे. त्याचा सदुपयोग विद्यार्थी-विद्यार्थिंनींनी घ्यायला हवे असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी अक्कमहादेवी कन्या शाळा स्थानिक नियंत्रण समितीचे अध्यक्ष बसनगौडा पाटील, एसडीव्हीएसचे उपाध्यक्ष अॅड. जी.एस. इंडी, संचालक काशीनाथ शिरकोळी, बाळासाहेब वैरागी, जयकुमार पाटील, डॉ. सी. बा. पाटील, प्रा. एल. व्ही पाटील, संसुध्दी सर, शाळेचे मुख्याध्यापक बी. ए. तळवार, डी. ए. बाडकर, श्रीमती कोळी मॅडम, शिक्षक-शिक्षिका विद्यार्थी-विद्यार्थिंनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार मुंदीनमनी यांनी मानले.
Belgaum Varta Belgaum Varta