Wednesday , December 10 2025
Breaking News

श्रीठाच्या खुल्या जागेने भाजी व्यापारी, शेतकऱ्यांना श्रीमंत बनविले : श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजी

Spread the love

संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर श्री दुरदुंडीश्वर होलसेल भाजी मार्केटच्या खुल्या जागेने भाजी व्यापारी, भाजीपाला उत्पादक शेतकरी, हमाल यांची आर्थिक परिस्थिती सुधारुन त्यांना श्रीमंत बनविल्याचे निडसोसी मठाचे पंचम श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजींनी सांगितले. संकेश्वर श्री दुरदुंडीश्वर होलसेल भाजी मार्केटच्या ३० व्या वर्धापनदिन समारंभात सहभागी श्रींनी आपले मनोगत व्यक्त केले. निडसोसी मठाचे पंचम श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजी, संकेश्वर श्री शंकराचार्य संस्थान मठाचे श्री सच्चिदानंद अभिनव विद्यानू्सिंह भारती महास्वामीजी, श्री शिवपंचाक्षरी स्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. उपस्थितांचे स्वागत दस्तगीर तेरणी यांनी केले. महास्वामीजी आणि मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने समारंभाची सुरुवात करण्यात आली. निडसोसी श्री पुढे म्हणाले, श्री दुरदुंडीश्वर मठा्ला श्री शंकराचार्य संस्थान मठाने ही जागा दान स्वरुपात दिली आहे. तीस वर्षांपूर्वी खुली जागा गलिच्छ होती. ती स्वच्छ करुन दस्तगीर तेरणी यांना होलसेल भाजी मार्केटकरिता भाडेतत्त्वावर देण्यात आली आहे. मठाला महिन्याकाठी भाजी मार्केटकडून अडीच लाख रुपये भाडे स्वरुपात मिळतात.सदर होलसेल भाजी मार्केटने गोवा, कर्नाटक, महाराष्ट्र राज्यात आपले चांगले बस्तान बसविले आहे. श्री मठाच्या खुल्या जागेने भाजी व्यापारी, भाजीपाला उत्पादक शेतकरी हमाल यांना श्रीमंत बनविले आहे. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ प्रमाणे येथे सर्वांचे भले झाल्याचे श्रींनी सांगितले. यावेळी श्रींच्या आणि माजी मंत्री ए. बी. पाटील, नगराध्यक्षा सौ. सिमाताई हतनुरी, प्रतिष्ठित नागरिक प्रकाश कणगली, माजी नगराध्यक्ष श्रीकांत हतनुरी, उपनगराध्यक्ष अजित करजगी, सुन्नत जमातचे अध्यक्ष हाजी हुसैनसाहेब मोकाशी, संकेश्वर घटक काॅंग्रेसचे अध्यक्ष संतोष मुडशी, दिलीप होसमनी यांचे हस्ते होलसेल भाजी व्यापारी, भाजीपाला उत्पादक शेतकरी, किरकोळ भाजी व्यापारी, पत्रकारांचा श्रींच्या व मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी हाजी अल्लाउद्दीन कलावंत, राजू सूतार, इमाम तेरणी, एकनाथ पवार, नवीद मुल्ला, हुसैन बागवान, सलीम शानुल, बसवराज केंगार, अल्ताफ मकानदार, इलाही बागवान, इर्षाद शेख, रमजान बागवान, इरफान तेरणी, मलिक बागवान, रब्बानी बागवान, पुट्टराजू हिरेमठ, सचिन गडीनाईक, संतोष कमनुरी, दस्तगीर कोच्चरगी, मनसूर बागवान, सागर अंम्मणगी, बाळकृष्ण परीट, जावेद मुल्ला, गजानन खानाई, शहाबुद्दीन तेरणी भाजी व्यापारी भाजीपाला उत्पादक शेतकरी किरकोळ भाजी व्यापारी, मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार मल्लिकार्जुन कुरबेट यांनी मानले.

About Belgaum Varta

Check Also

संकेश्वरातील नवसाला पावणाऱ्या निलगार गणपतीला जनसागर लोटला…

Spread the love  संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वरातील नवसाला पावणाऱ्या निलगार गणपती दर्शनासाठी आज जनसागर लोटलेला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *