
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर प्रभाग क्रमांक 13 पोटनिवडणूकसाठी भाजपाला उमेदवार मिळाला नाही. त्यामुळे भाजपाने दुसऱ्या प्रभागातील व्यक्तीला उमेदवारी दिल्याचे काॅंग्रेसचे नेते माजी मंत्री ए. बी. पाटील यांनी सांगितले. ते प्रभाग क्रमांक 13 मधील काॅंग्रेसचे उमेदवार ॲड. प्रविण नेसरी यांच्या गाडगी गल्लीतील प्रचारसभेत बोलत होते. अध्यक्षस्थानी बापू शिरकोळी यांनी भूषविले होते. प्रारंभी उपस्थितांचे स्वागत महंमदरेजा सोलापूरकर यांनी केले. प्रारंभी बसनगौडा पाटील, शिवकुमार नष्टी, ॲड. प्रविण नेसरी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
माजी मंत्री ए. बी. पाटील पुढे म्हणाले काॅंग्रेसने प्रभाग 13 करिता प्रभागातील लोकांची सभा घेऊन सर्वानुमते स्वच्छ प्रतिमेचे ॲड. प्रविण नेसरी यांना आखाड्यात उतरविले आहे. समाजकार्याची आवड असणारे नेसरी वकील प्रभागातील लोकांच्या हाकेला धावून जाणारे आहेत. भाजपाचा उमेदवार चोर आणि भाजपाचे नेतेही चोर आहेत. त्यामुळे प्रभाग 13 ची जनता काॅंग्रेस उमदेवाराच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली आहे. त्यामुळे येथे प्रविण नेसरी यांचा विजय निश्चित आहे. पालिकेतील सत्तारुढ गटाचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि सदस्यांकडून कोणतेच विकास कामे होईनासी झाली आहेत. कारण सत्तेची दोर नेतेमंडळींकडे राहिली आहे. पालिकेचं दफ्तर बागेवाडीत जाते आणि तेथून कामे ठरविली जातात. सतारुढ सदस्य नाममात्र सहीचे धनी बनले आहेत. आमचे काॅंग्रेसचे सदस्य पालिकेत आवाज उठवून विकास कामे करताहेत. कत्ती यांचा नामोल्लेख न करता ए. बी. पाटील म्हणाले हिरण्यकेशी कारखान्याची त्यांनी वाट लावली आहे. पूर्वी कारखान्याची दूध डेअरी होती. अदमासे दोनशे म्हैशी होत्या. आता तेथे रेडा देखील पहाल मिळेनासा झाला आहे. कारखाना व्वार्टरची अवस्था स्मशाना सारखी झाली आहे. कारखान्याची जमीन देखील विक्री केली गेली आहे. असे लोक कोणता विकास करणार आहेत. राज्यातील भाजप सरकारचे कमिशन प्रकरण उघडकीस आले आहे. येथील नेतेमंडळी देखील कमिशन घेऊन कामे करणारे आहेत. देशातील केंद्र आणि राज्यातील भ्रष्ट सरकार सर्व स्तरावर अपयशी ठरले आहे. महागाईने गोरगरिब कष्टकरी सर्वसामान्य लोकांचे कंबरडे मोडले आहे. संकेश्वरातील पोटनिवडणुकीत विरोधी उमेदवारांकडून पैशांचा बाजार चालणार असला तरी येथील सूज्ञ जनता त्याला भिक घालणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी सतीश पलसे, गंगाधर मुडशी, ॲड. आर. बी. पाटील, ॲड.विक्रम कर्निंग, नगरसेवक चिदानंद कर्देण्णावर, जितेंद्र मरडी, मुक्तार नदाफ, झाकीर मोमीन, मुस्तफा मकांनदार, रुपसिंग नाईक, कुमार कब्बूरी, संकेश्वर घटक काॅंग्रेसचे अध्यक्ष संतोष मुडशी दिलीप होसमनी, गजानन मेहतर, राजू मुंजण्णावर, गणेश कणगली, प्रकाश ईटेकर, जयकुमार पाटील, प्रशांत मन्नीकेरी प्रभागातील नागरिक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta