
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर प्रभाग 13 मधील भाजपाचे अधीकृत उमेदवार शिवानंद ऊर्फ नंदू मुडशी हे संकेश्वरचे रहिवासी आहेत. याच प्रभागात कडधान्य व्यापारकरित ते लहानाचे मोठे झाले आहेत. त्यामुळे ते बाहेरचे उमेदवार असे सांगण्यात तथ्य नसल्याचे भाजपाचे युवा नेते पवन कत्ती यांनी सांगितले. प्रभाग 13 मध्ये नंदू मुडशी यांच्या प्रचारफेरीत सहभागी होऊन ते पत्रकारांशी बोलत होते. प्रभाग 13 मधील सर्व मतदारांच्या घरोघरी जाऊन त्यांनी नंदू मुडशी यांना आशीर्वाद करण्याची विनंती केली. ते पुढे म्हणाले, विरोधकांकडे बोलायला भांडवल नाही. त्यामुळे ते कांहीबांही सांगत सुटले आहेत. नंदू मुडशी हे सच्चे समाजसेवक आहेत. संकेश्वरातील अनेक विकास कामे त्यांनी मंत्री उमेश कत्ती, माजी खासदार रमेश कत्ती यांचेकडून करुन दाखविली आहेत. आमचे लाडके नेते राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती, माजी खासदार रमेश कत्ती यांनी संकेश्वर सर्वांगिण विकासाचे लक्ष ठेवले आहे. संकेश्वरातील पिण्याचा पाणी प्रश्न असो शेतीचा पाणी प्रश्न त्यांनी सोडवून दाखविला आहे. संकेश्वरात नूतन बसस्थानक, पालिका इमारत सबरजिस्टर कार्यालय, हिरण्यकेशी साखर कारखाना ते संकेश्वर डॉ. हावळ इस्पितळापर्यंतचा जुना पी बी रोड चौपदरीकरणाचे काम त्यांनी करुन दाखविले आहे. संकेश्वरात लवकरच युजीडी योजना कार्यान्वित होत आहे. संकेश्वरच्या विकासाला साथ द्या, नंदू मुडशी यांना मत द्या. संकेश्वरात उर्वरित विकास कामे होण्यासाठी नंदू मुडशींना प्रभागातील मतदार निश्चितच आशीर्वाद करतील याचा संपूर्ण विश्वास मला आहे. संकेश्वर प्रभाग 13 संकेश्वरचा बालेकिल्ला असे म्हणाता येणार नाही. कारण यापूर्वी दिवंगत नगरसेवक संजय नष्टी हे भाजपकडून निवडले गेले होते. यावेळी देखील येथे भाजपाचाच उमेदवार विजयी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रचारात भारत माता की जय, नंदू मुडशी यांचा विजय असो. अशा घोषणा दिल्या जात होत्या. प्रचारात बेळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक गजानन क्वळी, शंकरराव हेगडे, राजेंद्र बोरगांवी, उपनगराध्यक्ष अजित करजगी, सभापती सुनिल पर्वतराव, नगरसेवक रोहण नेसरी, ॲड. प्रमोद होसमनी, सचिन भोपळे, गंगाधर पट्टणशेट्टी, बसवराज बागलकोटी, संदिप दवडते, पवन पाटील, सागर क्वळी, दिपक भिसे, चेतन बशेट्टी, संदिप गंजी, संतोष नेसरी संतोष कमनुरी, प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
Belgaum Varta Belgaum Varta