
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर प्रभाग 13 पोटनिवडणूक प्रचारात भाजपने आघाडी मिळविलेली दिसत आहे. येथील भाजपाचे उमेदवार शिवानंद ऊर्फ नंदू मुडशी यांच्या प्रचारार्थ माजी खासदार रमेश कत्ती, भाजपचे चिकोडी जिल्हा अध्यक्ष डॉ. राजेश नेरली, पवन कत्ती, राजेंद्र पाटील, माजी नगराध्यक्ष श्रीकांत हतनुरी, बसवराज बागलकोटी, नगराध्यक्षा सौ. सिमाताई हतनुरी, उपनगराध्यक्ष अजित करजगी, सभापती सुनिल पर्वतराव, नगरसेवक अमर नलवडे, अॅड. प्रमोद होसमनी, सचिन भोपळे, डॉ. मंदार हावळ, रोहण नेसरी सह अनेक मान्यवरांनी थेट मतदारांशी संपर्क साधून मतयाचना केली आहे.
माजी खासदार रमेश कत्ती यांनी येथील सुन्नत जमात, बनगार समाज, पत्तार समाज, नामदेव शिंपी समाज प्रमुखांशी आणि बाजारपेठेतील व्यापारी वर्गाशी थेट संपर्क साधून भाजपाचे उमेदवार शिवानंद ऊर्फ नंदू मुडशी यांना आशीर्वाद करण्याची विनंती करण्याबरोबर समाज प्रमुखांशी चर्चा करुन त्यांच्या समस्या जाणून घेण्याचे काम केले आहे.
यावेळी उमेदवार नंदू मुडशी, संगम साखर कारखाना अध्यक्ष राजेंद्र पाटील, प्रशांत पाटील, जिल्हा बँकेचे संचालक गजानन क्वळी शंकरराव हेगडे, माजी नगराध्यक्ष श्रीकांत हतनुरी, उपनगराध्यक्ष अजित करजगी, सभापती सुनिल पर्वतराव, नगरसेवक अमर नलवडे, सचिन भोपळे, रोहण नेसरी, पिंटू परीट, सुभाष चाळके, प्रकाश भोपळे, समाजप्रमुख समाज बांधव प्रभागातील नागरिक उपस्थित होते.
महिलांचा प्रचार
संकेश्वरच्या नगराध्यक्षा सौ. सिमाताई हतनुरी यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी प्रभागात प्रचार करुन भाजपचे उमेदवार शिवानंद ऊर्फ नंदू मुडशी यांना आशीर्वाद करण्याची विनंती केली. प्रचारात सौ. राजेश्री शिवानंद मुडशी, महादेवी पाटील महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
Belgaum Varta Belgaum Varta