
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर प्रभाग 13 पोटनिवडणुकीत काँग्रेसने मतदारांच्या गाठीभेटी घेण्यावर जादा लक्ष केंद्रित केलेले दिसताहे. येथील काँग्रेसचे उमेदवार अॅड प्रविण नेसरी यांच्या प्रचारार्थ माजी मंत्री ए. बी. पाटील यांनी गाडगी गल्ली, चाटे गल्लीत सभा घेऊन प्रविण नेसरी यांना आशीर्वाद करण्याची विनंती केली आहे. त्याचबरोबर ए. बी. पाटील यांनी विरोधी उमेदवाराचा पर्दाफाश करुन काँग्रेसचे हात बळकट करण्याची मागणी केली आहे.
अॅड. प्रविण नेसरी यांच्या प्रचाराची धुरा बसनगौडा पाटील, शिवकुमार नष्टी, संकेश्वर घटक काँग्रेसचे अध्यक्ष संतोष मुडशी सांभाळत आहेत. प्रभागातील मतदारांच्या गाठीभेटी घेऊन प्रविण नेसरी यांना आशीर्वाद करण्याची विनंती केली जात आहे. थेट मतदार गाठीभेटी कार्यक्रमात उमेदवार अॅड. प्रविण नेसरी, बसनगौडा पाटील, संतोष मुडशी, शिवकुमार नष्टी, अप्पासाहेब पचंडी, दिलीप होसमनी, नगरसेवक चिदानंद कर्देण्णावर, जितेंद्र मरडी, डॉ. जयप्रकाश करजगी, कुमार कब्बूरी, सुभाष कासारकर, महंमदरेजा सोलापूरकर, चरण खटावकर, गणेश तारळे, नासीर मुल्ला, झाकीर मोमीन, मुस्तफा मकांनदार, शिव मुंजण्णावर प्रभागातील नागरिक युवा वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झालेला दिसत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta