
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर स्वामी विवेकानंद कन्नड माध्यम शाळेच्या १५ मुला-मुलीनी दहावी परिक्षेत ९५% पेक्षा जादा गुण मिळविले असून कु. वृंन्दा महेश देसाई ९९.२% गुण मिळवून शाळेच नाव मोठं केल्याचे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष महेश देसाई यांनी सांगितले. ते गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिंनींचा सत्कार करुन बोलत होते. अध्यक्षस्थान शिक्षण संस्थेचे संस्थापक काडगौडा पाटील यांनी भूषविले होते. महेश देसाई पुढे म्हणाले आमच्या शाळेतील दहावीची नववी बॅच नविन विक्रम नोंदविणारी ठरली आहे. शाळेच्या १५ विद्यार्थ्यांनी दहावीच्या परिक्षेत ९५% पेक्षा जादा गुण मिळविले आहेत. कु. वृन्दा एम. देसाई हिने ९९.२% गुण मिळवून शाळेचं नाव मोठं करणारी विद्यार्थिंनी ठरली आहे. दहावी परिक्षेतील गुणवंत विद्यार्थी असे कु. वृन्दा एम देसाई (९९.२%), कु. दिशा शेलार
(९८.७२%), महंमदरिजवान मोमीन (९८.७२%), सुजल शमनेवाडी (९७.९२%), सृष्टी एस.पट्टणशेट्टी (९७.७६%), समृध्दी शिरगण्णावर (९७.६%), श्रेया चौगले (९७.४४ %), विजयलक्ष्मी गुरव (९७.२८%), सागर वरदण्णावर (९७.१२%), प्रिया के बस्तवाडी (९७.१२%), श्रीदेवी देसाई (९६.८%), मानसी परीट (९६.८%), सायना घेवारी
(९६.६४%), हेमावती हलकर्णी (९६.३२%), अशिश मुलाईगोळ (९५.२%) गुण मिळविले आहेत. यावेळी शिक्षण संस्थेच्या सचिव श्रीमती महादेवी पाटील यांनी शाळेच्या प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी कु. सुरेखा पाटील शाळेचे मुख्याध्यापक नवीन चौगला, शिक्षक लक्ष्मण नाईक, हालप्पा यंड्रावी, विनोद मगदूम, सातप्पा जोडकुरळी शिक्षिका विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta