Monday , December 8 2025
Breaking News

प्रभाग १३ ची माळ कोणाच्या गळ्यात…

Spread the love

संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर प्रभाग क्रमांक १३ च्या पोटनिवडणुकीसाठी अत्यंत चुरशीने मतदान पार पडल्यामुळे निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले दिसत आहे. निवडणुकीत कोण जिंकणार, कोण हरणार याकरिता तर्कवितर्क लढवले जात आहेत. येथे प्रथमच सर्वाधिक ७७% मतदान झाल्यामुळे याचा लाभ कोणाला मिळणार. याविषयी बरीच चर्चा केली जात आहे. तसे पाहिले तर प्रभाग क्रमांक १३ हा काॅंग्रेसचा बालेकिल्ला राहिल्याने येथे काॅंग्रेसचे उमेदवार ॲड. प्रविण नेसरी विजयी होणार असल्याचे काॅंग्रेसच्या समिक्षेतून सांगितले जात आहे. येथील भाजपचे उमेदवार शिवानंद ऊर्फ नंदू मुडशी यांना सर्वाधिक मतदान झाल्यामुळे भाजपाने गुलाल आमचाच असे सांगणे सुरू केलेले दिसत आहे. येथे मतदारांचा कौल कोणाला? यांचे उत्तर उद्या रविवार दि. २२ मे रोजी होणाऱ्या मतमोजणीतून समजणार आहे. आंमच्या प्रतिनिधीनी केलेल्या समिक्षेतून येथील निकाल भाजपचे उमेदवार शिवानंद ऊर्फ नंदू मुडशी यांच्या बाजूने लागण्याची शक्यता नाकारता येत नाही प्रभाग १३ च्या निवडणुकीत मतदानाच्या आदल्या दिवशी आणि मतदान दिवशी भाजपने चांगलीच मुसंडी मारलेली दिसून आली. काॅंग्रेस शेवटच्या दोन दिवसांत मनुष्यबळाने थोडेसे मागे पडलेले प्रकर्षाने दिसून आले. त्याचबरोबर भाजपाने निवडणुकीत सर्वशक्ती पणाला लावल्यामुळे काॅग्रेसची बाजू थोडीशी डगमगलेली दिसली. त्याचबरोबर भाजप नेत्यांनी पोटनिवडणूक प्रतिष्ठेची केल्यामुळे लोक अडचणीत सापडलेले दिसले. मतदान प्रक्रीया संपेस्तोपर्यंत माजी खासदार रमेश कत्ती, युवानेते पवन कत्ती, पृथ्वी कत्ती, जिल्हा बॅंकेचे संचालक गजानन क्वळी, शंकरराव हेगडे, संगम साखर कारखाना अध्यक्ष राजेंद्र पाटील, माजी नगराध्यक्ष श्रीकांत हतनुरी, सभापती सुनिल पर्वतराव, नगरसेवक अमर नलवडेसह भाजपा नेते लक्ष केंद्रित केलेलें दिसले. साधी प्रभागाची पोटनिवडणूक कत्ती बंधुंनी प्रतिष्ठेची केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात केली जात आहे.
प्रभाग क्रमांक १३ काॅंग्रेसचा बालेकिल्ला असून माजी मंत्री ए. बी. पाटील यांना मानणारा, त्यांच्या कार्यावर विश्वास ठेवणारा मोठा वर्ग असल्यामुळे येथे पैसांने भाजपाची डाळ कांहीं शिजणार नसल्याचे सांगितले जात आहे. येथील मतदारांचा अंदाज नेहमीच भाजपाला चकमा देणारा ठरला आहे. त्यामुळे थोड्या मतांनी का होईना येथे काॅंग्रेसचे उमेदवार ॲड. प्रविण नेसरी विजयी होणार असल्याचे सांगितले जात आहे.
येथील नेते मंडळी आणि लोकांतून अंदाज अपना-अपना वर्तविला जात आहे. कोणी भाजप तर कोणी काॅंग्रेसचा विजय निश्चित असल्याचे सांगत पैजा लावण्याची तयारी दर्शवित आहेत. निवडणूक निकालात कुकरची शिट्टी वाजणार असल्याचे सांगितले जात आहे. पैसा बोलता है! ची चर्चा देखील जोरदारपणे होतांना दिसत आहे.

About Belgaum Varta

Check Also

संकेश्वरातील नवसाला पावणाऱ्या निलगार गणपतीला जनसागर लोटला…

Spread the love  संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वरातील नवसाला पावणाऱ्या निलगार गणपती दर्शनासाठी आज जनसागर लोटलेला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *