Wednesday , December 10 2025
Breaking News

प्रभाग 13 पोटनिवडणुकीत भाजपचे नंदू मुडशी विजयी

Spread the love

संकेश्वर (महंमद मोमीन) :संकेश्वर प्रभाग 13 च्या पोटनिवडणुकीत भाजपचे नंदू मुडशी ३०२ मताधिक्याने विजयी झाले आहेत. मुडशी यांना ७१० तर पराजित काॅंग्रेसचे उमेदवार ॲड. प्रविण नेसरी यांना ४०८ मते मिळाली आहेत. सहा मतदारांनी नोटा मतदान केले आहे. निवडणूक जाहीर होताच नंदू मुडशी समर्थकांनी गुलालाची उधळण फटाक्यांची आतषबाजी करीत आनंदोत्सव साजरा केला. दरम्यान मुंडेंनी यांनी राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती, माजी खासदार रमेश कत्ती यांची भेट घेऊन त्यांचा आशीर्वाद घेतला. विजयोत्सवात युवानेते पवन कत्ती, महेश देसाई सभापती सुनिल पर्वतराव, नगरसेवक रोहण नेसरी, प्रदीप माणगांवी कुमार बस्तवाडी, सिध्दू पट्टणशेट्टी, जयप्रकाश सावंत, दिपक भिसे, संदिप दवडते, संतोष कमनुरी, दादासाहेब बेविनकट्टी, संदिप गंजी, राजू बोरगांवी, प्रविण नष्टी, चेतन बशेट्टी, सागर जकाते कार्यकर्ते सहभागी दिसले. विजयोत्सवात नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष सत्तारुढ गटाचे नगरसेवक कांही सहभागी दिसले नाहीत.

About Belgaum Varta

Check Also

संकेश्वरातील नवसाला पावणाऱ्या निलगार गणपतीला जनसागर लोटला…

Spread the love  संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वरातील नवसाला पावणाऱ्या निलगार गणपती दर्शनासाठी आज जनसागर लोटलेला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *