संकेश्वर (महंमद मोमीन) : प्रभाग क्रमांक 13 च्या पोटनिवडणुकीत भाजपने लोकांना पैशाचे आमिष दाखवून एकगठ्ठा मते मिळविली आहेत. निवडणुकीत पैसा जिंकला,मानुष्की हारल्याचे स्पष्ट झाल्याचे संकेश्वर घटक काॅंग्रेसचे अध्यक्ष संतोष मुडशी, दिलीप होसमनी यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
ते पुढे म्हणाले प्रभागाची साधी निवडणूक भाजपा नेत्यांनी प्रतिष्ठेची केली. निवडणुकीत लाखो रुपयांची उधळण करुन पैशाच्या जोरावर विजय मिळविला आहे. त्यामुळे प्रभाग 13 मधील आमचे काॅंग्रेसचे उमेदवार ॲड. प्रविण नेसरी हारुन जिंकले आहेत. प्रभाग क्रमांक 13 हा काॅंग्रेसचा बालेकिल्ला आहे. पुढे देखील तो आबादीत ठेवण्याचे काम आम्ही करुन दाखविणार आहोत. निवडणुकीत हार जित पेक्षा लोकांच्या प्रेमाला,विश्वासाला आमचे काॅंग्रेसचे उमेदवार ॲड. प्रविण नेसरी पात्र ठरले. ही गोष्ट अभिमानाची असल्याचे त्यांनी सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta