Tuesday , March 3 2026
Breaking News

विद्यार्थ्यांचं भविष्य घडविणारी एसडीव्हीएस शिक्षण संस्था : ए. बी. पाटील

Spread the love


संकेश्वर (महंमद मोमीन) : आमची श्री दुरदुंडीश्वर विद्या संवर्धक शिक्षण संस्था विद्यार्थ्यांचं उज्ज्वल भविष्य घडविणारी शिक्षण संस्था बनल्याचे शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष माजी मंत्री ए. बी. पाटील यांनी सांगितले. कला-विज्ञान महाविद्यालय सभागृहात दहावी परिक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभ आयोजित करण्यात आले होते.त्यात माजी मंत्री ए. बी. पाटील यांनी शिक्षण संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला. समारंभात दहावी परिक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. ए. बी. पाटील पुढे म्हणाले, आमच्या श्री दूरदुंडीश्वर विद्या संवर्धक शिक्षण संस्थेचा उत्तम शिक्षणात नावलौकिक राहिला आहे. एसडीव्हीएस शिक्षण संस्था संचलित एस.एस.(के) पाटील इंग्रजी माध्यम शाळेचा विद्यार्थी कु. ओम रेवण्णावर हा सर्वाधिक ९९.६८% गुण संपादन करुन गुणवत्ता यादीत चमकला आहे. कन्नड काॅन्वेट शाळेची विद्यार्थिनी कु. सुष्मा के. पाटील हिने ९९.२०% तर डी. एल. खोत हेब्बाळ शाळेची किर्तना खोत हिने
९९.५२% गुण मिळविले आहेत. अक्कमहादेवी कन्या शाळेत कुमारी स्वाती बस्तवाडी ९९.०४% एस. डी. हायस्कूलची कु.कावेरी पिंपळे ९८.०८% कणगला शाळेत कु. पूनम तोडकर, यादगूड शाळेत कु. मंगल नेरली ९६.६४% निडसोसी एसजेडी शाळेत सौजन्या बडिगेर ९८.४० गुण मिळविले आहे. आमच्या आठही शाळेचे मुले-मुली दहावी परिक्षेत घवघवीत यश संपादन करणारे ठरले आहेत. उत्तम शिक्षण आणि मुला-मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी आमच्या शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयात प्रवेश घेणेची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष ॲड. जी. एस. इंडी, संचालक ॲड. आर. बी. पाटील, गंगाधर मुडशी दयानंद केस्ती, विजय रवदी, विश्वनाथ तोडकर काशीनाथ शिरकोळी, प्रशासकीय अधिकारी डॉ. बी. ए. पुजारी, प्राचार्य श्रीमती यरगट्टी, प्राचार्य पी. एस. मुन्नोळी, प्राध्यापक शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक, शिक्षिका विद्यार्थी विद्यार्थिनी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

हिरण्यकेशी साखर कारखान्यातील क्रशिंग बेल्टमध्ये अडकून कामगाराचा मृत्यू

Spread the love  संकेश्वर : संकेश्वर शहरातील हिरण्यकेशी सहकारी साखर कारखान्यातील क्रशिंग बेल्टमध्ये अडकून कामगाराचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *