Sunday , September 8 2024
Breaking News

संकेश्वरात दिवसाढवळ्या ३.७५ लाख रुपयांची धाडशी चोरी

Spread the love

आदर्शनगर ५ क्राॅस येथे चोरीची घटना; औषध विक्रेते चोरांचे टार्गेट
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर आदर्श नगर ५ क्राॅस येथील प्रतिष्ठित नागरिक, जगदंबा मेडिकल स्टोअर्सचे मालक जयप्रकाश सावंत यांच्या जगदंबा निवासस्थानी सोमवार दि. २३ मे २०२२ रोजी दुपारी १.३० ते ४ वाजता दरम्यान अज्ञात चोरांनी घराचे कुलूप तोडून दिवसाढवळ्या ३.७५ लाख रुपयांची धाडसी चोरी करुन पोबारा केला आहे. चोरांनी घरातील ६६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे अलंकार, ७०० ग्रॅम चांदी, रोख ५० हजार घेऊन पोबारा केला आहे. पोलिसांनी पंचनाम्यात १ लाख ४७ हजार रुपयांची चोरी झाल्याचे नमूद केले आहे.
चोरीच्या घटनेविषयी पोलीस सूत्रांकडून आणि जयप्रकाश सावंत यांचेकडून समजलेली माहिती अशी सोमवार दि. २३ मे २०२२ रोजी सकाळी १० वाजता जयप्रकाश सावंत मेडिकल स्टोअर्सला गेले. त्यांची आई शशीकला सावंत या देखील दुपारी १.३० वाजता घराला कुलूप लावून शेजारच्या विनायक सावंत यांच्या घरी गेल्या होत्या. घरी कोणी नसल्याचा अंदाज घेत अज्ञात चोरांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. मजल्या घरातील फर्निचरमध्ये चोरांच्या हाती कांहीं लागले नाही. त्यामुळे चोरांनी दुसऱ्या मजल्यावर जाऊन बेडरुममधील ट्रेझरी फोडून त्यातील सोन्याचे नेकलेस (१५ ग्रॅम), सोन्याचे रॅंडम लाॅकेट (४ ग्रॅम), सोन्याचा गणपती लाॅकेट (२ ग्रॅम), घट्ट सोने (२० ग्रॅम), सोन्याच्या छोट्या मोठ्या अंगठ्या (२० ग्रॅम), सोन्याचं गणपती प्रेम बोर्ड (५ ग्रॅम), असे ६६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे अलंकार, ७०० ग्रॅम चांदी, ट्रेझरीमध्ये ठेवलेले रोख ५० हजार रुपये घेऊन पोबारा केला आहे. जयप्रकाश सावंत सायंकाळी ५ वाजता घरी गेले असता त्यांना घरात चोरी झाल्याचे दिसून आले. चोरीच्या घटनेची माहिती मिळताच आदर्श नगरमधील लोक सावंत यांच्या जगदंबा निवासस्थानी मोठ्या संख्येने जमा झाले. लागलीच संकेश्वर पोलिसांना चोरीच्या घटनेची माहिती देण्यात आली. संकेश्वर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रल्हाद चन्नगिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक गणपती कोगनोळी पोलीस बी. वाय. बजंत्री यांनी घटनास्थळी भेट देवून चोरीचा पंचनामा केला आहे. घटनास्थळी लोकांनी गर्दी करुन चोरी घडलेल्या ठिकाणी हाताचे ठसे उमटविल्यामुळे पोलीसांनी ठसे तज्ञे, श्वानपथकला पाचारण केले नाही. संकेश्वर पोलिस चोरांचा तपास लावण्यासाठी शर्थीचे प्रयत्न चालविले आहेत.
चोरीच्या घटनेची माहिती सांगताना जयप्रकाश सावंत म्हणाले घरातील मंडळी बाहेरी गावी गेले होती. त्यामुळे घरात आई होती. मी मेडिकल स्टोअर्सला आल्यानंतर आई घराला कुलूप लावून शेजारी विनायक यांच्या घरी यांच्या घरी गेल्या नंतर चोरीची घटना घडली आहे. आदर्श नगरच्या पाचव्या क्राॅसवर चोरांनी बाहेर पहारा देत घरावर दरोडा घातला असावा असे वाटते. चोर माहितगार असल्याचे चोरीच्या घटनेतून दिसून येते. जवळपास सीसीटीव्ही कॅमेरा नसल्याने चोरांचा छडा लावणे पोलीसांना शक्य झाले नाही. पोलिस चोरांच्या मागावर निघाले आहेत.त्यामुळे चोरांचा तपास लागेल असे वाटते.
मेडिकल दुकानावर चोरांचे टार्गेट
चोरांनी मेडिकल दुकानदारांना टार्गेट केलेले दिसताहे. यापूर्वी मारुती मेडिकलचे मालक रामचंद्र किल्लेदार यांच्या निवासस्थानी चोरांनी धाडशी दरोडा घातला होता. पोलिसांनी त्याचा तपास अद्याप लावलेला नसताना ही दुसरी घटना घडली आहे. संकेश्वर पोलिसांना चोरांनी चॅंलेज देत दिवसाढवळ्या धाडसी चोरी करुन पोबारा केला आहे. त्यामुळे संकेश्वर पोलीस चोरांचा छडा लावण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करताहेत. जयप्रकाश सावंत यांच्या चोरीच्या घटनेची नोंद संकेश्वर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

About Belgaum Varta

Check Also

वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप

Spread the love  दड्डी : सलामवाडी ता. हुक्केरी येथील दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित घटप्रभा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *