संकेश्वर (प्रतिनिधी) : नेरली तालुका हुकेरी येथील प्राथमिक कृषी सहकारी संघाच्या बिगर कर्जदार गटातील दिवंगत संचालक सुधीर पाटील यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणुक घेण्यात आली. निवडणुकीत भाजपचे प्रशांत भिमगोंडा पाटील यांना 127 मते तर निलेश जाधव गटाचे बसगौडा वीरगौडा पाटील यांना 207 मते मिळाली. निवडणूक अधिकारी श्री. सागर यांनी निलेश जाधव गटाचे बसगौडा पाटील 80 मताधिक्याने विजयी झाल्याचे घोषित केले. निवडणूक निकालानंतर निलेश जाधव गटाच्या समर्थकांनी फटाक्यांची तुफान आताषबाजीने, गुलालाची उधळण करीत विजयोत्सव साजरा केला. विजयी बसगौडा पाटील यांची गावातील प्रमुख मार्गे मिरवणूक काढण्यात आली. विजयोत्सवात निलेश गटाचे समर्थक अभिमानी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
Check Also
हरगापूरगड (ता. हुक्केरी) ग्राम पंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष बिनविरोध
Spread the love हुक्केरी : हरगापूरगड (ता. हुक्केरी) येथील ग्राम पंचायत अध्यक्ष व उपाध्यक्ष पदी …