संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर पालिकेचं एक काम बारा महिने थांब. असा प्रकार चालला आहे. याला अभियंता आर. बी. गडाद कारणीभूत ठरले आहेत. येथील प्रभाग क्रमांक ४ मधील उपाध्ये चाळीतील गटारीचे सांडपाणी रस्त्यावरून वाहताना दिसत आहे. कृष्णा आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी आणि उपाध्ये चाळीतील लोक गटारीच्या सांडपाण्यातून ये-जा करीत आहेत. याविषयी येथील नागरिकांनी नगरसेविका सौ. शेवंता कब्बूरी यांना वारंवार सांगून देखील गटारीचा बंदोबस्त कांही होताना दिसेनासा झाला आहे. गटार सांडपाण्यांने तुंबून सांडपाणी रस्त्यावरून वाहत आहे. गटार सांडपाण्याने तुंबून राहिल्यामुळे येथील नागरिकांना डासांचा उपद्रव सहन करावा लागत आहे. गटार सांडपाण्यांने तुंबून दुर्गंधी पसरली आहे. पालिकेचे प्रभारी मुख्याधिकारी आर. बी. गडाद इकडे कानाडोळा करताहेत. त्यामुळे समस्या जैसे थे राहिलेली दिसताहे. अभियंता आर. बी. गडाद यांच्या कामाची पध्दत एक काम बारा महिने थांब अशीच राहिली आहे. ते येथील साध्या रस्त्याचे काम गेल्या वीस वर्षांपासून करताहेत. त्यामुळे बोगस गडाद असा त्यांचा नामोल्लेख केला जात आहे. संकेश्वर पालिकेतून जगदीश ईटी हे स्वतःहून बदली करुन घेऊन निघून गेले. गडाद गेल्या कित्येक वर्षांपासून येथेच ठाण मांडून बसले आहेत. हुक्केरीचे आमदार राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्तीं हे संकेश्वरच्या सर्वांगिण विकासासाठी शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करुन विकास कामे राबवित आहेत. त्यांच्या विकास कामाला काळीमा फासण्याचे काम ईटी करुन गेले गडाला देखील करताहेत. साधीसुधी कामे करायला गडाद तयार नाहीत. संकेश्वर समस्यांचे गाव ठरविण्याचे काम ते करताहेत.
