Thursday , December 5 2024
Breaking News

शववाहिनी नादुरुस्त…

Spread the love


संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर पालिकेची शववाहिनी नादुरुस्त झाल्याने खांद्येकऱ्यांचा शोध घेतला जात आहे. संकेश्वर हिरण्यकेशी नदी काठावर हिन्दु स्मशानभूमी, लिंगायत रुद्र भूमी असल्याने शव वाहून नेण्याचे कार्य खांद्येकऱ्यांना करावे लागत आहे. संकेश्वरच्या नवीन वसाहतपासून स्मशान भूमी लांब पल्ल्याच्या अंतरावर असल्याने शव वाहून नेण्याचे कार्य कसरतीचे ठरतांना दिसत आहे.कांही लोक मृतदेह नेण्यासाठी ॲब्युलन्सचा वापर करतांना दिसत आहेत. सर्वसामान्य, गोरगरिब लोकांना खांद्येकरी शोधावे लागत आहेत.
शववाहिनी दुरुस्त करा..
चिकोडी जिल्हा काँग्रेस कामगार विभागचे अध्यक्ष महेश हट्टीहोळी यांनी पालिकेने लवकरात लवकर शववाहिनी दुरुस्तीचे कार्य करावे, अशी मागणी केली आहे. पालिकेची शववाहिनी लवकर दुरुस्त होणार नसेल तर पर्यायी व्यवस्था करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. ॲड. विक्रम कर्निंग म्हणाले संकेश्वर पालिकेने बैलहोंगल सारखी टाटाएस शववाहिनी सुरू करुन मयत कुटुंबियांची होणारी गैरसोय ताबडतोब थांबवायला हवी असल्याचे सांगितले. गेल्या वीस-पंचवीस दिवसांपासून पालिकेची शववाहिनी बंद पडल्याने मयत कुटुंबातील लोकांपुढे मृतदेह स्मशानापर्यंत घेऊन जाण्याचा प्रश्न निर्माण झालेला दिसत आहे. हुक्केरीचे आमदार राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती यांनी संकेश्वर पालिकेला शववाहिनी मिळवून देण्याचे कार्य केले. त्यामुळे गेल्या कित्येक वर्षांपासून मृतदेह घेऊन जाण्यासाठी शववाहिनीचा चांगला उपयोग होतांना दिसत आहे. गेल्या पंचवीस दिवसांपासून शववाहिनी नादुरुस्त होऊन बंद पडल्याने मृतदेह घेऊन जाण्याचा प्रश्न निर्माण झालेला दिसत आहे. संकेश्वरच्या नगराध्यक्षा सौ. सिमाताई हतनुरी, उपनगराध्यक्ष अजित करजगी, सभापती सुनिल पर्वतराव आणि सर्व पालिका सदस्यांनी शववाहिनी लवकरात लवकर दुरुस्त करुन सेवेसाठी सज्ज ठेवण्याची मागणी लोकांतून केली जात आहे.

About Belgaum Varta

Check Also

घटप्रभा नदीत बुडून दोन मुलासह वडिलांचा मृत्यू

Spread the love  हुक्केरी : मासे पकडण्यासाठी नदीत उतरले असता वडीलासह दोन मुलांचा नदीत बुडून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *