
संकेश्वर (महंमद मोमीन) : इंडस्ट्रीत क्वालिटी कंट्रोल करण्याचे कार्य केल्यास उत्पादित वस्तूंना चांगली बाजारपेठ निश्चितच लाभणार असल्याचे निडसोसी मठाचे पंचम श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजींनी सांगितले. श्रींच्या दिव्य सानिध्यात दि. बेळगाम इंडस्ट्रीयल को-ऑप बॅंक शाखा संकेश्वरचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. निडसोसी मठाचे पंचम श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजी, संकेश्वर श्री शंकराचार्य संस्थान मठाचे श्री सच्चिदानंद अभिनव विद्यानू्सिंह भारती महास्वामीजींच्या हस्ते फित सोडून संकेश्वर शाखेचे उद्घाटन करण्यात आले.
श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजी पुढे म्हणाले संकेश्वर गावाचा विकास होत आहे. आता इंडस्ट्रीयल को-ऑप बॅंकेची शाखा येये प्रारंभ केली जात आहे. त्याचा लाभ उद्योग-व्यवसायिकांनी करुन घ्यावयाचा आहे. हुक्केरी तालुक्यात अनेक इंडस्ट्रीज मोठे कारखाने सुरू होत आहेत. संकेश्वर भागातील युवकांनी नव्याने प्रारंभ होत असलेल्या कारखान्यात कांहीं वर्षे सेवा बजावून स्वतः उद्योगात झेप घेण्याचे कार्य करायला हवे आहे. येथे उद्योग व्यवसाय अभिवृद्धीला पोषक वातावरण आहे संकेश्वरला राष्ट्रीय महामार्ग लाभले असून, विमानतळ, रेल्वे स्थानक जवळपास आहेत. येथील कारखानदारांनी दर्जेदार वस्तुंचे उत्पादन केल्यास त्याला देश-विदेशात बाजारपेठ निश्चितच लाभणार असल्याचे सांगितले.
यावेळी श्रींच्या हस्ते प्रमुख पाहुणे आणि मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. उद्घाटन समारंभाला उद्योजक बाळकृष्ण हतनुरी, अण्णासाहेब पर्वतराव, संगम साखर कारखाना अध्यक्ष राजेंद्र पाटील, जिल्हा बॅंकेचे संचालक गजानन क्वळी, शिवानंद संसुध्दी, अमर नलवडे, डॉ. जयप्रकाश करजगी, आनंद शिरकोळी, उपनगराध्यक्ष अजित करजगी, शिवाजी कळवीकट्टीकर, माजी नगराध्यक्ष श्रीकांत हतनुरी, बसनगौडा पाटील, विनोद संसुध्दी, बॅंकेचे अध्यक्ष वेंकटेश सोनटक्की, उपाध्यक्ष शंकरराव हेगडे, राघवेंद्र नायडू ( सीईओ ), संचालक नामदेव ढवळी, गुरुसिध्दप्पा तिगडी, श्रीधर सातपुते, ग्यानप्पा वागोकर, सुरेश धोत्रे, बाबूराव इंगळी, अर्जुन ढवळी, भिमप्पा पातली, यलाप्पा मोरकर, राजेश बुचडी, गंगाराम दिवटे, श्रीकांत सोनटक्के, प्रकाश तळवार, सुनिता होसमनी, जगदीश कामकर, विरुपाक्षप्पा शिगीहळ्ळी, नसलहा समिती सदस्य भिमप्पा मल्हारीगोळ, शंकर केरीमनी, सदाशिव मेक्कळकी, श्रीमती अलका अप्पासाहेब हेगडे, अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत आणि आभार रेवनसिध्द मेकळक्की (सीईओ) यांनी मानले.
Belgaum Varta Belgaum Varta