Sunday , September 20 2026
Breaking News

अण्णा-तम्माच्या गुजगोष्टी….

Spread the love

संकेश्वर (महंमद मोमीन) : हुक्केरी विधानसभा मतक्षेत्रात अण्णा-तम्माचे राजकारण कार्यकर्त्यांना समजण्या पलिकडचे झाले आहे. त्यामुळे दोन्ही गटांचे नेते आणि कार्यकर्ते चांगलेच संभ्रमावस्थेत दिसत आहेत. येथे अण्णांची भूमिका माजी मंत्री ए. बी. पाटील, तर तम्माची भूमिका राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती उत्तम प्रकारे वठवित आहेत. दोघांमध्ये कधी इर्षेचे राजकारण तर कधी साथी हात बढानाचा प्रकार पहावयास मिळत आहे. नुकतेच बेळगांव येथे पार पडलेल्या एका विवाह समारंभात माजी मंत्री ए. बी. पाटील आणि राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती यांच्या गुजगोष्टी चांगल्याचं रंगलेल्या पहावयास मिळाले. दोघा नेत्यांनी इर्षेचे राजकारण बाजुला ठेऊन गप्पा-गोष्टीत तल्लीन होऊन गेल्याचे पाहून दोन्ही गटांचे नेते मंडळी, कार्यकर्ते, अभिमानी आर्श्चचकीत होऊन पहातच राहिले. ए. बी. – कत्ती यांच्यातील गप्पा-गोष्टींचा व्हिडिओ व्हायरल झाला असून तो बेळगांव जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात चांगलाच चर्चेत दिसतो आहे. ए.बी-कत्ती (सावकार) अण्णा-तम्मा, निकटचे स्नेही, असतील तर नेते मंडळी, समर्थक अभिमानी, कार्यकर्ते यांनी कशाला इर्षेच्या राजकारणात पडायचे? हा प्रश्न निर्माण झालेला दिसत आहे.

About Belgaum Varta

Check Also

गणेशोत्सवासाठी यमकनमर्डी पोलिसांकडून गणेश मंडळाना मार्गदर्शक सूचना : पीएसआय आर. बी. पाटील

Spread the love  मंडप, मिरवणूक व विसर्जनावेळी नियमांचे पालन करण्याचे आवाहन दड्डी वार्ताहर.. आगामी गणेशोत्सवाच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *