Thursday , September 19 2024
Breaking News

संकेश्वरात मृगाने शेतकऱ्यांची चिंता वाढविली..

Spread the love

संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर परिसरातील शेतकरी आकाशाकडे डोळा लावून बसलेले दिसताहेत. खरीपाची पेरणी तब्बल पंधरा-वीस दिवस लांबल्याने शेतकरी काळजीत पडलेले दिसत आहेत. संकेश्वर भागातील शेतकऱ्यांनी खरीप पेरणीपूर्वी मशागतीची कामे आटोपून पेरणीची तयारी केलेली दिसत आहे. पेरणीसाठी लागणारी बि-बियाने खरेदी करुन पेरणीसाठी बैलांची, शेतमजुरांची जमवाजमव केली जात आहे. पाऊस बरसताच पेरणीची धांदल उडणार आहे. मृग नक्षत्र काळात बरसणारा पाऊस खरीपाला पोषक समजला जातो. पण मृगाचा पत्ता काही दिसेनासा झाला आहे. मृग जाता-जाता बरसणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत दिसत आहेत. यंदा देखील शेतकऱ्यांची पहिली पसंत सोयाबीनच दिसत आहे. त्यामुळे संकेश्वर परिसरात जादतर खरीपात सोयाबीन दिसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यंदा सोयाबीनने शेतकऱ्यांना चार पैसे मिळवून दिल्यामुळे शेतकऱ्यांचा कल सोयाबीन पीक घेण्याकडे जादा दिसत आहे. भुईमूग शेंगा पेक्षा सोयाबीन लय भारी ठरलेले दिसत आहे. शेतीचा खर्च यंदा बराच वाढलेला दिसत आहे. त्यामुळे खर्चाचा मेळ बसविण्यासाठी शेतकऱ्यांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. मृग नक्षत्र काळात बरसणारा पाऊस सरते शेवटी वादळी पावसात रुपांतरीत होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. तसे घडल्यास पेरण्या आणखी लांबणीवर पडण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. पावसाने ढग भरुन येत असले तरी पाऊस हुलकावणी देऊन जात आहे.

About Belgaum Varta

Check Also

वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप

Spread the love  दड्डी : सलामवाडी ता. हुक्केरी येथील दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित घटप्रभा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *