Tuesday , March 3 2026
Breaking News

हुक्केरी तालुक्यातील होसूरमध्ये महिलेचा खून करून दागिने लंपास

Spread the love

हुक्केरी : हुक्केरी तालुक्यातील होसूरमध्ये घरात एकट्या असलेल्या महिलेचा खून करून दागिने लंपास केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. गावातील निवृत्त पीएसआय भीमराय अक्कतंगेरहाळ यांची दुसरी पत्नी मालुताई या घरात एकटी असल्याचे पाहून दरोडेखोरांनी त्यांच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबून हत्या केली. त्यानंतर त्यांच्या अंगावरील दागिने लुटले.
या घटनेने होसूर गावात एकच खळबळ माजली आहे. भीमराय आजारी असल्याने आपल्या पहिल्या पत्नी, मुलांच्या घरी मच्छे येथे राहण्यास गेले आहेत. त्यामुळे मालुताई एकट्याच घरी रहात होत्या. याची संधी साधून दरोडेखोरांनी डाव साधला. तोंडात बोळा कोंबून त्यांची हत्या करून त्यांच्या अंगावरील दागिने आणि घरातील दागिने व पैसे लुटून त्यांनी पोबारा केला. सीपीआय रमेश छायागोळ यांनी एफएसएल तज्ञांसह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
ठसे तज्ज्ञांनी काही ठसे घेतले आहेत. या घटनेने होसूर परिसरात एकच खळबळ माजली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या परिसरात अनेक लहान-मोठ्या चोर्‍या होत आहेत. याबाबत पोलिसांना कळवून देखील दाद दिली जात नाही. त्यामुळे गावात पोलिसांविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे.

About Belgaum Varta

Check Also

शुभम शेळके यांना हद्दपार करण्यासाठी आत्ता करवे चिकोडी तालुका घटक रस्त्यावर

Spread the love  बेळगाव : सीमाभागात सातत्याने मराठी भाषिकांच्या हक्कासाठी आवाज उठवणारे महाराष्ट्र एकीकरण समितीचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *