संकेश्वर (महंमद मोमीन) : हुक्केरी गावात घरफोडीच्या सलग घटना घडू लागल्याने नागरिकांनी पोलिसांविरोध आवाज उठविला होता. हुक्केरी पोलिसांनी याची गांभीर्याने दखल घेत घरफोडीच्या चौथ्या दिवसी चोराला गजाआड करुन चोराकडून ५७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. हुक्केरी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महंमदरफीक तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून घरफोडी प्रकरणातील चोराला गजाआड करण्यात आले आहे. हुक्केरी गावात विविध ठिकाणी झालेल्या चोरीच्या घटनेतील एक सोन्याचे बोरमाळ, एक मंगळसूत्र, सोन्याची कर्णफुले, पायातील चांदीचे पैंजण, रोख ५ हजार रुपये असा एकूण ५७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चोराला गजाआड करण्याकामी हुक्केरी पोलीस ठाण्याच्या पोलिस उपनिरीक्षक श्रीमती एल.एल. पत्तेण्णावर, ए.एस. सनदी (एएसआय), पोलिस कर्मचारी सी. डी. पाटील, आर. एस. ढंग, मंजुनाथ कब्बूर, वाय. एम. आरभांवी, ए. एल. नाईक, एम. के. अत्तार यांनी विशेष परिश्रम घेतले. हुक्केरी पोलीस ठाण्यात चोरीचा तपास लावण्यात आल्याची घटना नोंद करण्यात आली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta