
संकेश्वर (महंमद मोमीन) : आजी-माजी मंत्री योग साधनेने आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी करीत असल्याची चर्चा लोकांतून केली जात आहे. नुकताच आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्यात आला. येथील एस.डी हायस्कूल मैदानावर आयोजित योग दिवस कार्यक्रमात माजी मंत्री ए. बी. पाटील सहभागी होऊन तासभर योग साधनेत तल्लीन होऊन गेलेले दिसले. विजयपूर येथे विद्यमान आमदार राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्तीं यांची योगसाधना चाललेली दिसली. दोघे नेते मंडळी आरोग्याकडे विशेष लक्ष देताना दिसत आहेत. आगामी विधानसभेची निवडणूक मध्यावधी घोषित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजी-माजी मंत्री महोदयांनी विधानसभा निवडणुकीचा श्रीगणेशा योगसाधनेने केलेला दिसतो आहे. मंत्री उमेश कत्तीं यांनी हिडकल डॅम येथे आयोजित केलेल्या ‘हसीर हब्ब’ उद्यान काशी कार्यक्रम देखील विधानसभेच्या अनुषंगाने असल्याची चर्चा राजकीय वर्तुळातून होताना दिसत आहे. मंत्री उमेश कत्ती यांनी हसीर हब्ब कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरसंघचालकांना आंमत्रित करुन भाजपाची उमेदवारी नक्की करण्याचे कार्य केल्याची चर्चा देखील केली जात आहे. माजी मंत्री ए. बी. पाटील बेळगांव उत्तर विधानसभा मतक्षेत्र निवडणार असयाची चर्चा असली तरी ते हुक्केरीच्या आखाड्यात उतरणार असल्याचे सांगितले जात आहे. नेत्यांनी आरोग्य तंदुरुस्त ठेवण्याकडे जादा लक्ष केंद्रित केलेले दिसत आहे. त्यामुळे लोकांतून आजी माजी मंत्री विधानसभेची तयारी चालविल्याची चर्चा होताना दिसत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta