संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर राणी चन्नम्मा सर्कल ते डॉ. हावळ इस्पितळापर्यंतचा जुना पुणे-बेंगळूर रस्ता चौपदरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. नुकतीच माजी खासदार रमेश कत्ती यांनी चौपदरी रस्ता कामाची पहाणी करुन रस्ता शेजारच्या गटारीचे काम व्यवस्थित करण्याचा आदेश रस्ता निर्माण ठेकेदाराला दिला. रस्त्यावर कसलेच अतिक्रमण असता कामा नये असे त्यांनी बजावून सांगितले आहे. रमेश कत्ती यांनी इसाक सैय्यद यांना पोस्टा नजिकच्या बेकरीचा जिना काढून घेण्यास बजावून सांगितले आहे. बीएसएनएलची केबल व्यवस्थितपणे बुजविण्याचे काम करण्याचा आदेश त्यांनी धाडला आहे. यावेळी त्यांच्या समवेत जिल्हा बॅंकेचे संचालक गजानन क्वळी, नगरसेवक नंदू मुडशी, प्रदीप माणगांवी, सागर जकाते, सागर क्वळी, शंकर हेब्बाळे कार्यकर्ते उपस्थित होते.
Check Also
हरगापूरगड (ता. हुक्केरी) ग्राम पंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष बिनविरोध
Spread the love हुक्केरी : हरगापूरगड (ता. हुक्केरी) येथील ग्राम पंचायत अध्यक्ष व उपाध्यक्ष पदी …