संकेश्वर (महंमद मोमीन) : कोरोना महामारीमुळे गेली दोन वर्षे झाली पंढरपूर पायी वारीचे भाग्य संकेश्वरातील वारकरींना लाभले नव्हते. यंदा संकेश्वर परिसरातील वारकरींना पायी वारीचा योग पांडुरंगाच्या कृपेने मिळाला आहे. संकेश्वर येथे श्री क्षेत्र पंढरपूर आषाढी पायी दिंडी सुरू होऊन ४५ वर्षे झाली. उद्या मंगळवार दि. २८ जून २०२२ रोजी सकाळी ७ वाजता संकेश्वर श्री शंकराचार्य संस्थान मठापासून पायी दिंडींचे प्रस्थान होत आहे. पायी दिंडीमध्ये काकड आरती, भजन, हरीपाठ कार्यक्रम चालणार असून पायी दिंडी सोहळ्यात श्री राम वारकरी भजनी मंडळ नांगनूर तालुका गडहिंग्लज, अंकले भक्त मंडळीचा समावेश राहणार आहे. पायी दिंडी संकेश्वर येथून २८ जून २०२२ प्रस्थान होऊन सोमवार दि. ४ जुलै २०२२ रोजी सांगोल-खरडी श्री विठ्ठल मंदिर पंढरपूर येथे पोचणार आहे. श्री क्षेत्र पंढरपूर पायी दिंडी सोहळ्यात सहभागी होवू इच्छिणाऱ्यांनी अधिक माहितीसाठी सिध्दाप्पा हेब्बाळे (अध्यक्ष), सुरेश रावण (उपाध्यक्ष), सुभाष गायकवाड विणेकरी मोबाईल क्रमांक 9411112075, 7829668480 संपर्क साधावयाचा आहे.
Belgaum Varta Belgaum Varta