संकेश्वर (प्रतिनिधी) : घटप्रभा येथे नुकतीच जिल्हास्तरीय डान्स स्पर्धा पार पडली. स्पर्धेचे आयोजन डॉ. मुजगम समुहातर्फे करण्यात आले होते. जिल्हास्तरीय स्पर्धेतील ज्युनिअर गटात संकेश्वर दि युनिक डान्स स्टुडिओची विद्यार्थीनी कु. परिनिता जयप्पा लोहार हिने सहभागी होऊन दुसर्या क्रमांकाचे बक्षिस पटकाविले आहे. कु. परिनिताला नृत्यशिक्षक राहुल वारकरी यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले आहे. ज्युनियर गटातील स्पर्धेत कु.परिनिता ही सर्वात छोटी डान्सर ठरली आहे. परिनिता यांनी मिळविलेल्या यशाबद्दल तिचे नगरसेवक अॅड. प्रमोद होसमनी, गंगाराम भूसगोळ, माजी नगराध्यक्षा सौ. गौरम्मा वारकरी यांनी विशेष अभिनंदन केले आहे.