संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरातील लिंगायत रुद्रभूमिचा विचार समाजाचे नेते मंडळी कधी करणार? असा प्रश्न समाज बांधवांतून विचारला जात आहे. कारण लिंगायत रुद्रभूमिला जाण्याकरिता निटसा रस्ता नाही, आणि पावसाळ्यात रुद्रभूमित दफनविधी करता येत नाही. अशी अवस्था आहे. पावसाळ्यात हिरण्यकेशी नदीचे पाणी रुद्रभूमित शिरकाव करीत असल्याने वीरशैव लिंगायत समाज बांधवांना मयत व्यक्तीचा दफनविधी करणे कठीण होते. त्याचप्रमाणे रुद्रभूमित कोठेही खड्डा खाणला तर पाण्याचे फवारे उडू लागतात. त्यामुळे खड्डा खाणून दफनविधी पार पाडणे जमत नाही. यामुळेच पावसाळ्यात लिंगायत समाज बांधवांना प्रसंगी मयतावर दहनविधी (अग्निसंस्कार) करावे लागत आहेत. येथील रुद्रभूमिचा प्रश्न सोडविण्याचे कार्य नेतेमंडळी करायला तयार नसल्याने निडसोसी श्रींनी हा विषय आता गांभीर्याने घेतलेला दिसत आहे. लिंगायत समाजाकडे सत्तेची सूत्रे असून नसल्यासारखे झाले आहे. संकेश्वर विधानसभा असो आणि आताची हुक्केरी विधानसभा सत्ता लिंगायत समाजाच्या नेत्यांकडेच कायम राहिली आहे. समाजचे खासदार, आमदार, मंत्री नगरसेवक तसेच विविध संघ संस्थावरील पदाधिकारीं लिंगायत रुद्रभूमिचा प्रश्न एका झटक्यात सोडवू शकतात पण का कोणास ठाऊक रुद्रभूमिचा कोणी गांभीर्याने विचार करायला तयार नाही. त्यामुळे रुद्रभूमिचा विषय रखडत राहिलेला दिसत आहे. दिवंगत नगरसेवक संजय नष्टी यांनी रुद्रभूमिसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली पण त्यांना साथ कांहीं मिळाली नाही. आता लिंगायत वक्कूटचे युवक रुद्रभूमिसाठी पुढे सरसावलेले दिसत आहेत. त्यांना मंत्रीमहोदयांनी, आजी- माजी खासदारांनी पाठींबा देण्याची आवश्यकता आहे.
हिरण्यकेशी नदी काठची रुद्रभूमि गैरसोयीची असल्याने समाजाच्या नेतेमंडळींनी रुद्रभूमिसाठी चार-पाच एकर जमीन विकत घेऊन रुद्रभूमिचा विकास घडवून आणण्याचे कार्य करायला हवे आहे. समाज बांधवांनी मयताच्या अंत्यसंस्कार प्रसंगी रुद्रभूमिविषयी निव्वळ चर्चा करणेपेक्षा आता या कामासाठी प्रत्येकांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता असल्याची चर्चा केली जात आहे.
Check Also
हरगापूरगड (ता. हुक्केरी) ग्राम पंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष बिनविरोध
Spread the love हुक्केरी : हरगापूरगड (ता. हुक्केरी) येथील ग्राम पंचायत अध्यक्ष व उपाध्यक्ष पदी …