संकेश्वर (महंमद मोमीन) : हुक्केरीचे आमदार राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्तीं नेहमीच या- ना त्या कारणाने कायम चर्चेत राहिलेले दिसत आहेत. मंत्री उमेश कत्ती कोणत्या प्रसंगी काय बोलतील आणि काय करतील हे सांगता यायचे नाही. त्यामुळे प्रसार माध्यमांंत ते कायम चर्चेत राहिलेले दिसत आहेत. बेंगळूर येथे पार पडलेल्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांचा सत्कार मंत्री उमेश कत्ती यांचे हस्ते होता. मंत्री उमेश कत्तीं यांनी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांचा सत्कार करताना बोम्माई यांना पुष्पहार घालून स्वतःच्या डोक्यावर फेटा घालून घेतला. त्यामुळे कार्यक्रमाचे आयोजक थोडेसे गोंधळून गेलेले दिसले. मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी स्मित हास्य करुन वेळ मारुन नेण्याचे काम केले. परवा कर्नाटक राज्य विभाजनाच्या विषयांने चर्चेत असलेले मंत्री कत्ती आज फेटा विषयांने पुन्हा चर्चेत दिसत आहेत. सदर फेट्याच्या प्रसंगातून मंत्री उमेश कत्ती यांनी नेक्स्ट सीएम आपणच होणार असल्याचे दाखवून दिले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta