Sunday , September 22 2024
Breaking News

हिरण्यकेशीत मासेमारीला उधाण..

Spread the love

संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर हिरण्यकेशी नदीला पावसाचे नवीन पाणी आल्यामुळे मासेमारीला उधाण आलेले चित्र पहावयास मिळाले. हिरण्यकेशी नदीला आलेले नवीन पाणी पहाण्यासाठी लोकांनी एकीकडे गर्दी केलेली असताना युवकांनी मासेमारी करण्यासाठी गर्दी केलेली दिसली. नदीतील नवीन पाण्यातून गळाला मोठे मासे लागत असल्याच्या चर्चेतून नदी काठावर मासेमारीसाठी युवकांची मोठी गर्दी झालेली पहावयास मिळाली. नदीच्या नवीन पाण्यामुळे अनेकांनी फिशफ्रायचा बेत देखील आखलेला दिसला. हिरण्यकेशी नदीचे उगमस्थान महाराष्ट्र राज्यातील रामतीर्थ जवळपास असल्याने आजरा, गडहिंग्लज तालुक्यातील धरणांचे ओव्हरफ्लो पाणी हिरण्यकेशी नदीला सोडले जाते. त्यामुळे हिरण्यकेशी नदी पावसाळ्यात दुथडी भरून वाहू लागते. अतिवृष्टीमुळे २०१९ आणि २०२१ मध्ये हिरण्यकेशी नदीला महापूरचा फटका बसला होता. यंदा देखील नदी-नाल्यातील केरकचरा, गाळ,वाळू उपसा केले गेलेले नसल्यामुळे थोडा देखील जादा पाऊस झाला तरी हिरण्यकेशीला महापूर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

About Belgaum Varta

Check Also

वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप

Spread the love  दड्डी : सलामवाडी ता. हुक्केरी येथील दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित घटप्रभा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *