
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर श्री शंकराचार्य संस्थान मठाचे श्री सच्चिदानंद अभिनव विद्यानू्सिंह भारती महास्वामीजी हे भक्तांना भक्तीमार्ग दाखविणारे, धर्माची शिकवण देणारे असल्याचे श्री राघवेंद्र स्वामी मठ मंत्रालयचे श्री सुबूंधेंद्र तीर्थ महास्वामीजींनी सांगितले. नुकतीच मंत्रालय श्रींनी संकेश्वर श्री शंकराचार्य संस्थान मठाला भेट देऊन संकेश्वर स्वामीजींबदल गौरवोद्गार काढले. मंत्रालयाचे श्री सुबूंधेंद्र तीर्थ महास्वामीजींचे संकेश्वर मठ गल्लीत आगमन होताच भक्तगणांकडून भक्तीपूर्वक जंगी स्वागत करण्यात आले. मंत्रालय श्रींनी श्री शंकराचार्य संस्थान मठात महादेवाच्या पिंडीवर पुष्पवृष्टी करुन विधीवत पूजा करून देवदर्शन घेतले. तदनंतर श्री शंकराचार्य संस्थान मठातर्फे श्रींचा सन्मान करण्यात आला. मंत्रालयाचे श्री पुढे म्हणाले, संकेश्वर श्री शंकराचार्य संस्थान मठाला वेदशास्त्रसंपन्न महास्वामीजी लाभले आहेत. श्रींनी मठात पुष्कळ सुधारणा घडवून आणल्या आहेत. श्रींचे मंत्रालयाला नेहमी येणे-जाणे असते. आम्हा संन्यासींना वेदधर्माचे कर्तव्यनिष्ठेने पालन करावे लागते. वेदधर्माचे पालन करणे आंमचे मुख्य उद्देश आणि कर्तव्य आहे. त्याचबरोबर भक्तांना भक्तीमार्ग दाखविणे, त्यांना धर्माचे शिक्षण देणे हे देखील आंमचे आद्यकर्तव्य आहे. हे काम संकेश्वर श्री सच्चिदानंद अभिनव विद्यानू्सिंह भारती महास्वामीजी कर्तव्यनिष्ठेने पार पाडत असल्याचे श्रींनी सांगितले. यावेळी मठाचे पुरोहित श्रीपाद उपाध्ये, मदन पुराणिक मठाचे व्यवस्थापक अर्जुन कानवडे, गणपा पाटील, सचिन सपाटे भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta