Sunday , September 20 2026
Breaking News

वल्लभगड श्री शारदा शाळेत पर्यावरण दिन, डाॅक्टर्स डे साजरा.

Spread the love

संकेश्वर (महंमद मोमीन) : वल्लभगड येथील विद्या संवर्धन शिक्षण संस्था संचलित श्री शारदा पूर्व प्राथमिक शाळेत नुकतेच पर्यावरण दिन, वसुंधरा दिन आणि डाॅक्टर्स‌‌‌ डे उत्साही वातावरणात साजरे करण्यात आले. कार्यक्रमात शाळेचे अध्यक्ष अनंत भोसले यांचे हस्ते संकेश्वरचे सेवाभावी डॉ. सुनिल आळतेकर यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना डॉ. सुनिल आळतेकर म्हणाले मुलांनो निरोगी राहण्यासाठी तुम्हाला रोज व्यायाम करावा लागेल.त्यामुळे तुम्ही तंदुरुस्त राहाल. पर्यावरण दिन, वसुंधरा दिन साजरा करताना वृक्षवल्लीची जोपासना केली गेली पाहिजे. कोणतीही गोष्ट सांगणे पेक्षा ती कृतित आणायला हवी असल्याचे त्यांनी सांगितले. उपस्थितांचे स्वागत आणि प्रास्ताविक भाषण सौ. श्रावणी जोशी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. अर्चना शेलार यांनी केले. आभार शिक्षिका सौ. सरोजिनी रजपूत यांनी मानले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लखमगौडा पाटील, हरगापूर ग्रामपंचायत सदस्य संजय कोकितकर, तसेच विलास शेलार, बापू माने, बंडू बोरे, सौ. मंजुषा शिंदे, सरिता शेंडे, रामा तेलवेकर, संतोष जोशी, अवधूत जोशी ग्रामस्थ शाळेचे विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

गणेशोत्सवासाठी यमकनमर्डी पोलिसांकडून गणेश मंडळाना मार्गदर्शक सूचना : पीएसआय आर. बी. पाटील

Spread the love  मंडप, मिरवणूक व विसर्जनावेळी नियमांचे पालन करण्याचे आवाहन दड्डी वार्ताहर.. आगामी गणेशोत्सवाच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *