
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर सुन्नत जमात तंजिम कमिटीकडून नुकताच मान्यवरांचा सत्कार आणि विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ बरकत हाॅलमध्ये संपन्न झाला. प्रारंभी उपस्थितांचे स्वागत श्रीमती ए.एम कोहली, समिराबानो गुत्ती यांनी केले. समारंभाचे अध्यक्षस्थान सुन्नत जमात तंजिम कमिटीचे अध्यक्ष हाजी हुसैनसाहेब मोकाशी यांनी भूषविले होते. समारंभात पदोन्नती मिळविलेले श्रीमती समरीन एस. कमते (केएएस) कर्मशिअल टॅक्स अधिकारी, पीएचडी पदवी प्राप्त केलेले डॉ.केंपण्णा तळवार, चिकोडीत पीईओ बढती मिळविलेले ए. डी. गडेकाई, हिरण्यकेशी साखर कारखान्यात सिक्युरिटी ऑफिसर बनलेले बाबासाहेब नांगनुरी, मुख्याध्यापिका शबाना जमादार यांचा हाजी हुसैनसाहेब मोकाशी, हाजी अल्लाउद्दीन कलावंत, नगरसेवक हारुण मुल्ला, असिफ गजेंद्रगड यांचे हस्ते यथोचित सन्मान करण्यात आला. तसेच दहावी परिक्षेतील १८ आणि बारावी परिक्षेतील १२ गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. यावेळी सरकारी उर्दू कन्नड शाळेचे मुख्याध्यापक एस. व्ही. खडकभांवी, शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष अकील नदाफ, तन्वीर मकानदार (केएएस), जमातचे सदस्य, बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरीफ रमजान यांनी केले. आभार गुल्जारबानो गुत्ती यांनी मानले.
Belgaum Varta Belgaum Varta