
संकेश्वर (महंमद मोमीन) : अंकले ग्रामपंचायत सदस्य भरत फुंडे यांचा वाढदिवस सरकारी कन्नड-मराठी शाळेतील शालेय मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करुन साजरा करण्यात आला. भरत फुंडे यांनी २५० शालेय मुलांना अंकलिपी, कंपास वाटप केले. यावेळी शाळेतर्फे भरत यांचा सन्मान करुन वाढदिवसाच्या शुभेच्छा प्रदान करण्यात आल्या. यावेळी बोलताना भरत फुंडे म्हणाले, मोठ्या कष्टातून शिक्षण घेतांना आपणाला सातवी पर्यंत कंपास मिळालं नाही. कंपासाचे आपणाला मोठे आकर्षण होते. पण घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे कंपास घेता येत नव्हते. त्यामुळे आपण शालेय मुलांना कंपास अंकलिपी देऊन वाढदिवस साजरा करीत असल्याचे सांगितले. यावेळी ॲड. जी. आर. पाटील, शिवानंद कमते (सीए), अंकले ग्रामपंचायत सदस्य विश्वनाथ पाटील, ईश्वर बाडकर, ईश्वर कोनकेरी, अंकलेचे प्रतिष्ठित नागरिक अंगद जरळी, संतोष फुंडे, शंकर फुंडे, अरुण सुर्यवंशी, राजू करमे, श्रीकांत गस्ती, शिवानंद बाडकर मराठी शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष शशीकांत सुर्यवंशी, शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका ग्रामस्थ, शालेय मुले-मुली उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta