
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर हिरण्यकेशी स्विमिंग ग्रुपच्या वतीने आज हिरण्यकेशी नदीला आलेल्या नवीन पाण्याचे गंगा पूजन करण्यात आले. हिरण्यकेशी स्विमिंग ग्रुपचे सदस्य पुरोहित वामन पुराणिक यांनी हिरण्यकेशी गंगेचे विधिवत पूजन केले. संकेश्वर श्री शंकराचार्य संस्थान मठाचे श्री सच्चिदानंद अभिनव विद्यानू्सिंह भारती महास्वामीजींच्या हस्ते स्विमिंग ग्रुपला प्रोत्साहन देणारे तमण्णा गाडवी यांचा सत्कार करण्यात आला. हिरण्यकेशी स्विमिंग ग्रुपचे सदस्य पुष्पराज माने आमच्या प्रतिनिधीशी बोलताना म्हणाले, आमच्या ग्रुपच्या वतीने दरवर्षी हिरण्यकेशी नदीला आलेल्या नवीन पाण्याचे गंगा पूजन केले जाते. नदीच्या पाण्यात विशेष करुन महापूराच्या पाण्यात पोहण्याची मजा कांही औरच असते. आमच्या ग्रुपचे सदस्य महापुरात पोहणेत नेहमीच आघाडीवर राहिले आहेत. पोहणे हा सर्वोत्तम व्यायम असून यामुळे माणूस निरोगी राहतो, असे त्यांनी सांगितले. यावेळी अशोक मास्तीहोळीमठ, सुहास कुलकर्णी, बाबूराव मरीगुद्दी, राजू शिंदे, देवदास भोसले, जरन फर्नांडिस, चिदानंद निरवाणीमठ, शिवानंद पाटील, मल्लीकार्जुन शिरहट्टी, प्रकाश भोई, संजय कोळेकर, प्रकाश भूसगोळ, ग्रुपचे सर्व सदस्य उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta