संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर परिसरातील तमाम मुस्लिम बांधवांनी ईद-उल-अजहा बकरी ईद परंपरागत पद्धतीने शांततेने पार पाडण्याचे आवाहन संकेश्वर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रल्हाद चन्नगिरी यांनी केले. संकेश्वर पोलिस ठाण्यावर आयोजित ईदच्या शांतता सभेत त्यांनी मुस्लिम बांधवांना ईद विषयी मार्गदर्शन केले. ते पुढे म्हणाले ईद साजरी करताना मुस्लिम बांधवांनी शांततेच्या संदेशाचे पालन करावे. ईदची नमाज पठन करुन परंपरागत पद्धतीने कुर्बानीचा कार्यक्रम पार पाडावा. ईद साजरी करणेस कोणाचीच हरकत नाही. पण कांहीं गोष्टींचे काटेकोरपणे पालन करायला हवे असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा प्रदान केल्या. यावेळी संकेश्वर सुन्नत जमात तंजिम कमिटीचे अध्यक्ष हाजी हुसैनसाहेब मोकाशी हाजी अल्लाउद्दीन कलावंत, मोमीन समाजाचे हाजी मैनोद्दिन कारेकाजी, नगरसेवक हारुण मुल्ला, इम्रान नालबंद, रियाज फणीबंद, अल्ताफ शाहेण्णावर, हुसैन मुल्ला, मलिक जमादार, संकेश्वर घटक काॅंग्रेस अल्पसंख्याक विभागाचे उपाध्यक्ष मुस्तफा मकांनदार, परवेज मुल्ला, संकेश्वर, सोलापूर, होनेहोळी गोटूर येथील मुस्लिम बांधव उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत आणि आभार पोलिस कर्मचारी जंबगी यांनी मानले.
Check Also
हरगापूरगड (ता. हुक्केरी) ग्राम पंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष बिनविरोध
Spread the love हुक्केरी : हरगापूरगड (ता. हुक्केरी) येथील ग्राम पंचायत अध्यक्ष व उपाध्यक्ष पदी …