अपघातात कार चालक, दोघे शिष्य किरकोळ जखमी
संकेश्वर (महंमद मोमीन) : निडसोसी मठाचे चालते-बोलते देव समजले जाणारे पंचंम श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजींच्या इनोव्हा कार पलटी होऊन झालेल्या अपघातात निडसोसी मठाचे पंचम श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजी बालबाल सुखरुप बचावले आहेत. कार चालक रमेश माळी आणि कार मधील श्रींचे दोघे शिष्य किरकोळ जखमी झाले आहेत. अपघात घडलेल्या प्रसंगी इनोव्हामधील बलून खुले झाल्यामुळे अपघात स्वामीजी, कारचालक आणि दोघे श्रींचे शिष्य सुखरुप बचावल्याचे सांगितले जात आहे. अपघाताची बातमी बेळगांव, बागलकोट जिल्ह्यात वाऱ्यासारखी पसरली आणि सर्व स्तरातून, भक्तगणांतून श्रींच्या प्रकृतीची चौकशी होताना दिसली. अपघाताची श्रींच्या निकटवर्तीय शिष्यगणांकडून समजलेली माहिती अशी निडसोसी मठाची स्वामीजी हुबळी येथील वास्तूशास्त्र तज्ञ, सरल वास्तू फेम चंद्रशेखर गुरुजी यांच्या अंत्ययात्रेत सहभागी होऊन गावाकडे आपली इनोव्हा कारगाडी क्रमांक केए 69/एम -1944 परततांना हुबळी-धारवड रस्ता येथील मुल्ला धाब्याजवळ इनोव्हा स्कीड होऊन दोन-तीन वेळा पलटी होऊन झालेल्या अपघात निडसोसी स्वामीजी सुखरुप बचावले आहेत. अपघात दुपारी ४.३० वाजता घडल्याचे सांगितले जात आहे. अपघातत कार चालक रमेश माळी, कारमधील श्रींचे दोघे शिष्य किरकोळ जखमी झाले आहेत. श्रींच्या इनोव्हाला अपघात झाल्याचे समजताच धारवाड येथील श्रींचे भक्तगण अपघात स्थळी धाऊन गेले. भक्तगणांनी श्रींना आणि त्यांच्या दोघा शिष्यांना कारमधून सुखरुप बाहेर काढून लागलीच उपचारासाठी बेळगांव केएलई इस्पितळात दाखल केले. केएलई इस्पितळातील तज्ञ डॉक्टर श्रींच्यावर उपचार करीत आहेत. श्रींच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी माजी खासदार रमेश कत्ती लागलीच केलेली दाखला झाले. त्यांनी श्रींची भेट घेऊन विचारपूस केली. यावेळी नगरसेवक रोहण नेसरी, भक्तगण उपस्थित होते.
कांही काळजी करु नका मी ठिक आहे…
माजी खासदार रमेश कत्ती यांनी श्रींंच्या प्रकृतीची विचारपूस करतात स्वामीजी म्हणाले भक्तगणांना सांगा माझी कांही काळजी करु नका. मी ठिक आहे. मला कोठेच दुखापत झालेली नाही.देवाकृपेने अनर्थ टळला आहे. संकेश्वर, गडहिंग्लज हुक्केरी भागातील श्रींचे भक्तगण श्रीच्या प्रकृतीची विचारपूस करताना श्री दुरदुंडिश्वर देवाकडे प्रार्थना करताहेत.निडसोसी मठावर भक्तांना अपघाताची माहिती जाणून घेण्यासाठी एकच गर्दी केलेली पहावयास मिळाली.