संकेश्वर (महंमद मोमीन) : खनदाळ तालुका गडहिंग्लज येथील श्रीसंत सद्गुरू बाळूमामा मंदिरात आषाढीला विविध धार्मिक कार्यक्रमांंचै आयोजन करण्यात आल्याची माहिती देवस्थान विश्वस्त कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. येत्या रविवारी १० जुलै २०२२ रोजी आषाढी एकादशीला निलजी ते खनदाळ श्रीसंत सद्गुरू बाळूमामा मंदिरापर्यंत दिंडी सोहळा संपन्न होणार आहे. सायंकाळी प्रवचन, पूजा, आरती आणि भजन आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ७ वाजता मजलट्टी येथील श्री बसवानंद महाराज यांचै प्रवचन होणार आहे. सोमवार दि. ११ जुलै २०२२ रोजी मंदिरात पूजा आरती अभिषेक आणि अश्वाचे नृत्य सादर केले जाणार आहे. दुपारी महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सद्भक्तांनी श्री संत सद्गुरू बाळूमामा धार्मिक उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होऊन पुनित होण्याचे कार्य करावे. अधिक माहितीसाठी भक्तांनी मोबाईल क्रमांक 9637714071, 8007467445 संपर्य साधावयाचा आहे.
Belgaum Varta Belgaum Varta