
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरात आज मुस्लिम बांधवांनी ईद-उल-अजहा (बकरी ईद) अमाप उत्साहात साजरी केली. तरणा पाऊस संततधार बरसत असल्यामुळे मुस्लिम बांधवांना ईदची नमाज ईदगाह ऐवजी मशीदमध्ये पठण करावी लागली. सुन्नत जमातने ईदची नमाज सकाळी सात वाजता तर मोमीन (मेहदी) समाज बांधवांनी ईदची नमाज सकाळी ८.३० वाजता पठन केली. नमाज नंतर मौलवींनी खुदबा बयान केला. तदनंतर सर्वांनी एकमेकांना आलिंगन देऊन ईद मुबारक अदान-प्रदान केली. यावेळी बोलताना हाजी महंमदहुसैन गडंमफल्ली म्हणाले ईद-उल-अजहा (बकरी ईद) त्याग व बलिदानाची आठवण करुन देणारी आहे. पैगंबरांनी या ईदच्या माध्यमातून अल्लाहप्रती असणारं प्रेम आपल्या त्यागातून दाखवून दिले आहे. हजरत इब्राहिम, हजरत इस्माईल यांचं त्याग आणि बलीदानाची आठवन करुन देणारा हा सण ठरला आहे. ईदच्या नमाजमध्ये आम्ही सर्वांच्यासाठी प्रार्थना केली आहे. हिंदू-मुस्लिम भाईचारा कायम राहणार असून आम्ही नमाजमध्ये प्रवाहपिडीतांसाठी प्रार्थना केल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी संकेश्वर घटक काॅंग्रेस अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष जाकीर मोमीन, हाजी शफी कारेकाजी, अल्ताफ कारेकाजी, अख्यतर कारेकाजी, निजाम मोमीन, मुर्तुजा मोमीन, महामूद गडंमफल्ली, शब्बीर कारेकाजी, समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुन्नत जमातने सकाळी सात वाजता नमाज अदा करण्याचा निर्णय घेऊन तो पार पाडलेला दिसला. येथील जुम्मा मशीद बिलाल मशीद नुरानी मशीद आणि आवटे मोहल्ला मशीदीत ईदची नमाज पठन करण्यात आली. सुन्नत जमातचे अध्यक्ष हाजी हुसैनसाहेब मोकाशी हाजी अल्लाउद्दीन कलावंत, नगरसेवक हारुण मुल्ला, झुल्फिकार कलादगी बाबासाहेब नांगनुरीसह जमात प्रमुख्यांनी हिंदू-मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा प्रदान केल्या. हिंदू बांधवांनी मुस्लिम बांधवांची गळाभेट घेऊन बकरी ईदच्या शुभेच्छा प्रदान केल्या आहेत. नमाजनंतर मुस्लिम बांधव कबरीस्तानमध्ये जिआरत कार्यक्रमात सहभागी दिसले. कुर्बानीचा कार्यक्रम पार पडला. कोणतीथ अनुचित घटना घडू नये म्हणून सर्वच मशीदजवळ पोलिस तैनात दिसले.
Belgaum Varta Belgaum Varta