
संकेश्वर (महंमद मोमीन) : शिक्षणाला परिश्रमाची जोड हवी असल्याचे कणेरी मठाचे परमपूज्य श्री अदृष्य काडसिध्देश्वर महास्वामीजींनी सांगितले. संकेश्वर येथील एसडीव्हीएस शिक्षण संस्था संचलित एस.एस.के. पाटील इंग्रजी माध्यम शाळेच्या नूतन वास्तू उद्घाटन सोहळ्यात सहभागी होऊन श्रींनी शिक्षण कसे असायला हवे असल्याचे सांगितले. प्रारंभी शाळेय मुलींनी शानदार नृत्य सादर केले. उपस्थितांचे स्वागत एस.एस.के. पाटील इंग्रजी माध्यम शाळा स्थानिक नियंत्रण समितीचे अध्यक्ष ॲड. आर. बी. पाटील यांनी केले. प्रास्ताविक भाषणात शिक्षण संस्थेचे सेक्रेटरी जी. सी. कोठडी यांनी शिक्षण संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला. कणेरी मठाचे परमपूज्य श्री अदृष्य काडसिध्देश्वर महास्वामीजी. संकेश्वर श्री शंकराचार्य संस्थान मठाचे श्री सच्चिदानंद अभिनव विद्यानू्सिंह भारती महास्वामीजींच्या दिव्य सानिध्यात उद्घाटन सोहळा संपन्न झाला. श्रींच्या व मान्यवरांच्या हस्ते वृक्षरोपाला जलार्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. श्री अदृष्य काडसिध्देश्वर महास्वामीजी पुढे म्हणाले, केवळ माहिती देणारे शिक्षण असता कामा नये. शिक्षणातून मनुष्य घडविण्याचे काम होण्याची आवश्यकता आहे. शिक्षणाला परिश्रमाची जोड असायला हवी. मुलांना शिक्षणातून श्रमाची जाणीव करुन द्यायला हवी. ज्ञानात भर पाडणारे आणि मनाला श्रध्देकडे नेणारे शिक्षण असायला हवे. शिक्षण प्रेमी एसडीव्हीएस शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष माजी मंत्री ए. बी. पाटील हे मुलांना संस्कारसंपन्न शिक्षण देण्याचे कार्य करीत आहेत त्यांनी ग्रामीण भागातील मुलांना शहरात मिळणारे दर्जेदार शिक्षण माफक शुल्कात आपल्या शिक्षण संस्थेत देण्याचे कार्य चालविले आहे. ए. बी. पाटील यांच्यासारखे सोज्ज्वळ राजकारणी मिळणे अपवादात्मक असल्याचे श्रींनी सांगितले.
आपली संस्कृती जोडणारी, दिपप्रज्वलन करणारी असल्याने वाढदिवस साजरा करतांना या गोष्टीचं भान प्रत्येकांनी ठेवायला हवे असल्याचे श्रींनी स्पष्टपणे सांगितले. श्री म्हणाले वाढदिवस साजरा करतांना आपण पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण करताहोत. त्यामुळे केक कापणे, मेणबत्ती विझविणे या गोष्टी प्रकर्षाने पहावयास मिळत आहेत. आपली संस्कृती कापणारी नसून जोडणारी आहे. आपल्या संस्कृतीत दिप विझविणे हे अपशकून मानलं गेलं आहे. दिपप्रज्वलन करणे हे शुभसंकेत समजले जाते. आपल्या संस्कृतीत वाढदिवस औक्षण करून पुष्पवृष्टी करुन मिठाई वाटप करुन साजरा करण्याची प्रथा आहे.
यावेळी समारंभाच्या अध्यक्षस्थानी बोलताना माजी मंत्री ए. बी. पाटील म्हणाले, आपल्या वाढदिवसाला कोणी हार-तुरे आणू नका, असे आपण सांगितले होते. हार-तुरे, पुष्पगुच्छचे पैसे पेटीत टाकल्यास त्याचा सदुपयोग गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला निश्चितच होणार आहे. पाश्चात्यांचे अनुकरण करून वाढदिवस साजरा करणे ही चांगली गोष्ट नसल्याचे सांगून ते म्हणाले एसडीव्हीएस शिक्षण संस्थेच्या विकासात शिक्षणकांचा सिहांचा वाटा असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आय.ए.एस. परिक्षा उत्तीर्ण झालेल्या साहित्या अरळगट्टी यांचा सन्मान करण्यात आला. समारंभाला गडहिंग्लजचे माजी आमदार श्रीपतराव शिंदे, बाळकृष्ण हतनुरी, शिक्षणाधिकारी एम. आय. हंचाट्टी, क्षेत्र शिक्षणाधिकारी मोहन दंडीन, युनियन बँकेचे मॅंनेजर ज्ञानेश कुमार, एसडीव्हीएस शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष ॲड. जी.एस.इंडी, संचालक ॲड. आर. बी. पाटील, संचालक विनयगौडा पाटील, गंगाधर मुडशी, बसनगौडा पाटील, काशीनाथ शिरकोळी, दयानंद केस्ती, विश्वनाथ तोडकर, विजय रवदी, चिकोडी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, संकेश्वर घटक काॅंग्रेसचे अध्यक्ष संतोष मुडशी, दिलीप होसमनी, अविनाश नलवडे, प्रदीप आलुरकर, प्रकाश मैलाके, संकेश्वर मराठा अभिवृद्धी संघाचे अध्यक्ष अप्पा मोरे, उपाध्यक्ष सुभाष कासारकर, पुष्पराज माने, सुधाकर ओतारी, शौकत मालदार, जयकुमार पाटील, रेखा चिकोडी, नगरसेवक डॉ. जयप्रकाश करजगी, जितेंद्र मरडी, चिदानंद कर्देण्णावर, डॉ. मंदार हावळ, विनोद नाईक, प्रशांत कोळी, महादेव केसरकर, अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta