संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर बेंदूर कमिटीतर्फे खास बेंदूरनिमित्य आयोजित हुक्केरी तालुका स्तरीय आणि संकेश्वर शहर स्तरीय बैलजोडी उत्कृष्ट स्पर्धेला उदंड प्रतिसाद लाभला. बळीराजा आपल्या पोशिंदा बैलांचा बैलपोळा सण पावसाची पर्वा न करता अमाप उत्साही वातावरणात साजरा करताना दिसला. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या उत्कृष्ट बैलजोडींची गावातील प्रमुख मार्गे सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. बैल, बिनदाती पाडा तेल आणि हुरमंजने न्हाऊन निघालेले दिसले. बैलांसमवेत बळीराजा देखील हुरमंजने न्हाऊन निघालेला दिसला. संकेश्वर श्री महालक्ष्मी मंदिर आवारात आज दुपारी १ वाजता संकेश्वर श्री शंकराचार्य संस्थान मठाचे श्री सच्चिदानंद अभिनव विद्यानू्सिंह भारती महास्वामीजींनी पूजा करुन स्पर्धेला चालना दिली. स्पर्धेचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष श्रीकांत हतनुरी, नगरसेवक संजय शिरकोळी यांनी केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बसवराज बस्तवाडी, पैलवान अप्पासाहेब कर्देण्णावर उपस्थित होते. उपनगराध्यक्ष अजित करजगी, सभापती सुनिल पर्वतराव, नगरसेवक अमर नलवडे, संजय शिरकोळी, शिवानंद मुडशी, कुमार बस्तवाडी, राजेंद्र बोरगांवी, ॲड. प्रविण नेसरी, नबीसाहेब हुंचाळकर, पोलिस उपनिरीक्षक गणपती कोगनोळी अनेक मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेचे परिक्षण तब्बल पाच तास चालले.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे
संकेश्वर शहर स्तरीय तयार बैलजोडी स्पर्धेचे पहिले बक्षिस विराट रविंद्र मराठी, दुसरे बक्षिस नागराज देसाई, तिसरे बक्षिस काशीस तहसीलदार यांच्या बैलजोडींने पटकाविले.
तालुका स्तरीय तयार बैलजोडी स्पर्धेचे पहिले बक्षिस जहांगिर राजेसाहेब कडलगी (येल्लीमन्नीळी), दुसरे बक्षिस बाप्पा बाळाप्पा गुडगनट्टी (मांगनूर), तिसरे बक्षिस गुरसिध्दप्पा कहते (गोटूर), चौथे बक्षिस शिवानंद केदारी हिरेकोडी (करजगा) यांनी पटकाविले.
तयार पाडा स्पर्धेचे पहिले बक्षिस कलप्पा मगदूम (जिनवाड), दुसरे बक्षिस मल्लिकार्जुन मिरजी (संकेश्वर), निंगप्पा गोटूरे (सोलापूर), बिनदाती पाडा स्पर्धेचे पहिले बक्षिस मलप्पा ईश्वर भांडार यांनी पटकाविले. विजेत्यांना बक्षिसे माजी नगराध्यक्ष श्रीकांत हतनुरी, सभापती सुनिल पर्वतराव, नगरसेवक संजय शिरकोळी, शिवानंद मुडशी, पैलवान अप्पासाहेब कर्देण्णावर, बसवराज बस्तवाडी, कुमार बस्तवाडी, नबीसाहेब हुंचाळकर, पट्टेद यांच्या हस्ते देण्यात आली. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी स्पर्धा संयोजक नगरसेवक चिदानंद कर्देण्णावर, गंगाधर बोरगल्ली, मारुती गस्ती, काडेश बस्तवाडी, रामू काकोळी, अनिल खातेदार, कुशेंद्र मरडी, आकाश खाडे, प्रदीप कर्देगौडा सुधीर पाटील आणि बेंदूर कमिटीच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.