संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरात बेंदूर निमित्त सदृढ बैलजोडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.स्पर्धेत करजगा येथील शिवानंद हिरेकोडी यांचा पाखऱ्या बैल चांगलाच लक्षवेधी आणि चर्चेत दिसला. पाखऱ्याचा तो रुबाब स्पर्धा संयोजकांना आणि उपस्थित शेतकऱ्यांना देखील चांगलाच भावलेला दिसला. सेकीन होसूर येथील प्रतिष्ठित शेतकरी देवेगौडा पाटील यांनी राजा-पाखऱ्या बैलजोडीला सदढ बनविल्या मुळे करजगा येथील प्रगतशील शेतकरी शिवानंद हिरेकोडी यांनी पाटलांच्या बैल जोडीला चांगला भाव देऊन खरेदी व्यवहार पूर्ण केला. संकेश्वराती सदृढ बैलजोडी स्पर्धेत राजा-पाखऱ्या बैलजोडीने १० हजार रुपयांचे बक्षिस पटकाविले आहे. वडरगे गावातील सदृढ बैलजोडी स्पर्धेत राजा-पाखऱ्या प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले आहेत. आमच्या प्रतिनिधीशी बोलताना देवेगौडा पाटील म्हणाले राजा-पाखऱ्याची बैलजोडी विविध स्पर्धेत सहभागी होऊन बक्षिसांची मानकरी ठरत आहे. बळीराजाचं बैलांप्रती असलेलं प्रेम मोठ आहे. स्पर्धेच्या निमित्ताने बळीराजाने आपल्या बैलांना सदृढ बनविण्याचे कार्य केले आहे. संकेश्वरातील स्पर्धेत राजा-पाखऱ्या लक्षवेधी ठरल्याचे त्यांनी सांगितले.