
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरात शिडल्याळींची आरोग्य सेवा गोरगरिबांना लाभदायक ठरावी, असे बेळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष माजी खासदार रमेश कत्ती यांनी सांगितले. ते शिडल्याळी मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटलच्या उद्घाटन समारंभात बोलत होते. निडसोसी मठाचे पंचंम श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजींच्या दिव्य सानिध्यात उद्घाटन सोहळा संपन्न झाला. श्रींच्या व मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने समारंभाची सुरुवात करण्यात आली. उपस्थितांचे स्वागत बिरगौडर यांनी केले. रमेश कत्ती पुढे म्हणाले, शिडल्याळी मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटलमध्ये चांगले डाॅक्टर उपलब्ध करुन देण्याबरोबर चॅरीटीच्या माध्यमातून गोरगरिब कष्टकरी सर्वसामान्य रुग्णांना माफक दरात आरोग्य सेवा मिळवून देण्याचे कार्य करायला हवे असल्याचे सांगितले. निडसोसी मठाचे पंचंम श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजी आपल्या आर्शिवचनात म्हणाले, अलीकडे लोकांत रोगप्रतिकारक शक्तीचा अभाव दिसतो आहे. त्यामुळे आरोग्य सेवेला आणखी महत्व प्राप्त झाले आहे. संकेश्वरात शिडल्याळी बंधुंनी आरोग्य सेवेचे कार्य हाती घेतले आहे. गरीबांना शिडल्याळींची आरोग्य सेवा उपयुक्त ठरावी, असे कार्य होण्याची आवश्यकता असल्याचे श्रींनी सांगितले.
यावेळी दुंडेश शिडल्याळी, माजी नगराध्यक्ष श्रीकांत हतनुरी, आर.एम.पाटील, डॉ. रमेश दोडभंगी, डॉ. शिरीष शेट्टी, बेळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक गजानन क्वळी, बसवराज बस्तवाडी, सभापती सुनिल पर्वतराव, नगरसेवक ॲड. प्रमोद होसमनी, रोहण नेसरी, पवन पाटील, हनुमंत हेद्दुरशेट्टी, सागर क्वळी, सागर जकाते, चेतन बशेट्टी, सुधाकर ओतारी, सौ. शांता दुंडेश शिडल्याळी, सौ. विजयालक्ष्मी आनंद शिडल्याळी, सौ. स्नेहा संतोष शिडल्याळी, सौ. वाणीश्री सिध्दू नुच्ची, रमेश शिडल्याळी, महेश शिडल्याळी अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta