Tuesday , March 3 2026
Breaking News

संकेश्वरातील नेहरु रस्त्याचे रुंदीकरण कधी….?

Spread the love

संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर नेहरु रस्ता रुंदीकरणाचे कार्य हाती घेण्याची आवश्यकता असल्याचे युवानेते बसनगौडा पाटील यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. ते म्हणाले संकेश्वरच्या जुन्या गावात नेहरु रस्ता, सुभाष रस्ता ही बाजारपेठ समजली जायची. संकेश्वर गावाचा विस्तार वाढत गेला तशी बाजारपेठ जुन्या पी. बी. रोड, कमतनूर वेस ते लक्ष्मी बेकरी पर्यंत वसलेली दिसत आहे. त्यामुळे गावातील नेहरु रस्ता, सुभाष रस्ता, आझाद रस्ता दुर्लक्षित झालेला दिसत आहे.नेहरु रस्ता अरुंद असल्यामुळे येथे ॲब्युलन्स, अग्निशमन दलाचे वाहन जाऊ शकत नाही. त्यामुळे येथे कोणतीही दुर्घटना घडली तर ॲब्युलन्स असो अग्निशमन दलाच्या जवानांना मोठी कसरत करावी लागते. येथे फर्लांगभर दूर ॲब्युलन्स, अग्निशमन दलाचे वाहन उभे करुन मदतकार्य करावे लागते. याकरिता नेहरु रस्ता रुंदीकरणाचे काम हुक्केरीचे आमदार राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्तीं, पालिकेच्या नगराध्यक्षा सौ. सिमाताई हतनुरी उपनगराध्यक्ष अजित करजगी, सभापती सुनिल पर्वतराव, आणि पालिकेच्या सर्वच सदस्यांनी हाती घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. येथे दुर्घटना घडलेल्या प्रसंगी निव्वळ चर्चा करुन अरुंद रस्त्याचा प्रश्न सोडविता येणार नाही. त्याकरिता नेतेमंडळींनी हा विषय आता गांभीर्याने विचाराधीन घेण्याची आवश्यकता आहे. परवा नेहरु रस्ता येथील सेंट्रल स्टोअर्स आणि किराणा दुकानाला आग लागली असता अग्निशमन दलाला आपले वाहन फर्लांगभर लांब थांबवून मदतकार्य करावे लागले. हे कार्य करतांना अग्निशमन दलाचे जवान आणि पालिकेच्या सफाई कामगारांची मोठी दमछाक झालेली दिसली. मंंत्रीमहोदयांनी येथील व्यापारी वर्गाला विश्वासात घेऊन नेहरु रस्ता रुंदीकरणाचे कार्य करायला हवे आहे. नेहरु रस्ता सध्या तरी वन-वे दिसत आहे. या रस्त्यावर अवजड वाहने घेऊन जाता येत नाही. नेहरु रस्ता रुंदीकरणाचे कार्य केले गेल्यास त्याचा लाभ येथील व्यापारी वर्गाला निश्चितच होणार आहे येथील व्यापाराला पुन्हा अच्छे दिन येण्याकरिता रस्ता रुंदीकरण करण्याचे काम करण्याची नितांत आवश्यकता निर्माण झाली आहे. संकेश्वरातील अनेक रस्ते अरुंद आहेत.ते आवश्यकतेनुसार रुंदीकरण करण्याचे कार्य करायला हवे असल्याचे त्यांनी सांगितले.

About Belgaum Varta

Check Also

हिरण्यकेशी साखर कारखान्यातील क्रशिंग बेल्टमध्ये अडकून कामगाराचा मृत्यू

Spread the love  संकेश्वर : संकेश्वर शहरातील हिरण्यकेशी सहकारी साखर कारखान्यातील क्रशिंग बेल्टमध्ये अडकून कामगाराचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *