
संकेश्वर (महंमद मोमीन) : बेळगांव ग्रामीण मतक्षेत्राच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आज निडसोसी श्री दुरदुंडीश्वर सिध्द संस्थान मठाला भेट देऊन देवदर्शनासह मठाचे पंचम श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजींची भेट घेऊन श्रींच्या आरोग्याची विचारपूस केली. आमदार लक्ष्मी हेब्बाळकर स्वामीजींबरोबर बोलताना म्हणाल्या, स्वामीजी तुमच्या इनोव्हाला अपघात झाल्याचे समजताच आपणाला धक्काच बसला. तुम्ही अपघातात सुखरुप बचावल्याची माहिती मिळाल्यानंतर आपण सुटकेचा निःश्वास सोडला. श्री दुरदुंडीश्वर देवाची कृपा श्रींच्यावर सदाकाल असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आम. हेब्बाळकर यांनी श्रींचा आर्शीवाद घेतला. आम. हेब्बाळकर यांच्या समवेत संकेश्वर घटक काॅंग्रेसचे अध्यक्ष संतोष मुडशी, चिकोडी जिल्हा काँग्रेस कामगार विभागचे अध्यक्ष महेश हट्टीहोळी, दिलीप होसमनी, निलेश जाधव, संतोष पाटील, बसवराज बोरगली, रेखा दादूगोळ, नगरसेवक चिदानंद कर्देण्णावर, कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta