
संकेश्वर (महंमद मोमीन) : विश्वगुरु श्री बसवेश्वरांचे वचन साहित्य समाजाला दिशा देणारे असल्याचे मजलट्टी सरकारी पदवीपूर्व महाविद्यालयाचे प्राध्यापक व्ही. बी. पाटील यांनी सांगितले. ते संकेश्वर श्री दुरदुंडीश्वर सभामंडप येथे गुरुपौर्णिमा निमित्त आयोजित एकदिवसीय विशेष व्याख्यान कार्यक्रमात वक्ते म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाला दिव्य सानिध्य बैलूरचे परमपूज्य श्री बसव चेतन देवरु स्वामीजींचे लाभले होते. अखिल भारत वीरशैव लिंगायत महासभा तालुका घटक हुक्केरी-संकेश्वरतर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान अखिल भारत वीरशैव लिंगायत महासभा हुक्केरी तालुका घटकच्या अध्यक्षा सौ. हेमलता जी. इंडी यांनी भूषविले होते.
श्रींच्या व मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रा. चौगला पुढे म्हणाले हजारो वर्षांपूर्वी विश्वगुरु श्री बसवेश्वरांनी जातीयतेच्या बिमोड करण्याबरोबर जाती, वर्ण, वर्गरहित समाज निर्माणचे कार्य करुन दाखविले आहे. बसवेश्वरांचे वचन साहित्य समाज सुधारणेत मोलाची कामगिरी करणारे ठरल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून अखिल भारत वीरशैव लिंगायत महासभा बेळगांव जिल्हा घटकच्या अध्यक्षा रत्नप्रभा व्ही. बेल्लद उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती गाडवी यांनी केले. कु.श्रेयस गाडवी यांनी प्रार्थना सादर केली. कार्यक्रमाला साहित्य प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta