संकेश्वर (महंमद मोमीन) : अंकले ग्रामपंचायत विहिरीचे पाणी कुरणं गोशाळेला देण्याचा ठराव सर्वानुमते संमत करण्यात आल्याची माहिती अंकले ग्रामपंचायतचे अध्यक्ष एकनाथ पोवार यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली.
ते पुढे म्हणाले, निडसोसी मठातर्फे कुरणं येथील गो-शाळा चालविली जाते. गोशाळेतील गायींना शुध्द पिण्याचे पाणी अंकले ग्रामपंचायतच्या विहिरीतून मिळवून देण्याची मागणी मठातर्फे करण्यात आली होती. श्रींच्या मागणीची दखल घेऊन अंकले ग्रामपंचायतने विहिरीचे पाणी कुरणं गोशाळेला देण्याचा ठराव नुकत्याच पार पडलेल्या ग्रामसभेत मांडून सर्व सदस्यांच्या संमतीने मंजूर करुन घेतला आहे. ठरावाची प्रत निडसोसी मठाचे पंचम श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजींना प्रत्यक्ष भेटून सुपुर्द करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. निडसोसी श्रींची भेट घेऊन अंकले ग्रामपंचायतने संमत केलेल्या ठरावाची प्रत श्रींना सुपुर्द करतांना अंकले ग्रामपंचायतचे अध्यक्ष एकनाथ पोवार, सदस्य भरत फुंडे, ईश्वर कोनकेरी, ईश्वर बाडकर, पप्पूगौडा पाटील, अनेक मान्यवर उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta