संकेश्वर : गोवा राज्यातून बेकायदेशीर मध्याची वाहतूक करणार्या वाहनाची तपासणी करून 280 बॉक्स असे अठरा लाखाची दारू अबकारी विभागाने धाड घालून जप्त करून कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत वाहन चालक बसवराज वीरभद्र दिंडलकुट्टी (वय 36) रा. खनगाव असे अटक करण्यात आलेल्या चालकाचे नाव आहे.
अबकारी विभागाला मिळालेल्या माहितीनुसार टाटा आयशर कंपनीच्या वाहन क्रमांक केए 25 सी 5844 या वाहनातून विनापरवाना बेकायदेशीर दारूची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार अबकारी खात्याने कमतनूर सर्कल येथे त्या वाहनाची झडती घेऊन पाहणी केली असता यामध्ये 280 दारूचे बॉक्स आढळून आल्याने ते जप्ती करण्यात आले याची किंमत अठरा लाख तीस हजार रुपये इतकी होत असल्याची माहिती चिकोडी जिल्हा अधिकारी उपायुक्त जगदीश कुलकर्णी यांनी देण्यात आली.
या वाहन चालकावर वाहनावर गुन्हा दाखल करून वाहतूक करत असलेली दारू जप्त करण्यात आली आहे.