
संकेश्वर (महंमद मोमीन) : राजस्थानी लोक नोकरीपेक्षा मालक होणे पसंद करतात असे कणेरी मठाचे अदृश्य श्री काडसिध्देश्वर महास्वामीजींनी सांगितले. शिडल्याळी व्यापारी संकुलात नव्याने प्रारंभ करण्यात आलेल्या जसलोक स्वीट दुकानाचे उद्घाटन करुन श्रींनी आपले मनोगत व्यक्त केले. संकेश्वर श्री शंकराचार्य संस्थान मठाचे श्री सच्चिदानंद अभिनव विद्यानू्सिंह भारती महास्वामीजी, कणेरी मठाचे अदृश्य श्री काडसिध्देश्वर महास्वामीजीनी फित सोडून जसलोक स्वीट दुकानाचे उद्घाटन केले.
श्री पुढे म्हणाले, चौधरी बंधुंनी राजस्थान येथून येऊन कर्नाटक महाराष्ट्र राज्यात जसलोक स्वीट दुकानाचे उत्तम बस्तान बसविले आहे. त्यांनी लोकांना चांगली मिठाई विक्री करुन लोकांचे विश्वास संपादन केले आहे. राजस्थानी लोक परप्रांतात येऊन नोकरी शोधत नाहीत. ते उद्योग व्यवसाय चालवून मालक होणे पसंद करतात. उद्योग व्यवसायावरील त्यांची श्रद्धा इतरांनी अनुकरणीय असल्याचे श्रींनी सांगितले.
उद्घाटन समारंभाला नगराध्यक्षा सौ. सिमाताई हतनुरी, माजी नगराध्यक्ष श्रीकांत हतनुरी, डॉ. बी. ए. पुजारी, नगरसेवक संजय शिरकोळी, सचिन भोपळे, गंगाराम भूसगोळ, ॲड. प्रमोद होसमनी, महादेव मन्नोळी, सदा कब्बूरी, किरण किंवडा, अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जसलोक स्वीट मार्टचे मालक देवराम चौधरी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना म्हणाले, जसलोक स्वीट दुकानातील काजू कलाकंद, रस मलाई, मलाई कलाकंद, गुलाबजामून, खाजा, प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर अन्य मिठाई आणि चिवडा लोकांच्या पसंदीला उतरलेला आहे. आम्ही जसलोक स्वीटची सुरवात निपाणी येथून केली. आज आंमच्या जसलोक स्वीटची दुकाने गोकूळ शिरगांव, शिरोली, हुपरी, हेरले,आणि संकेश्वर येथे ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली दिसताहेत. आमच्या जसलोक स्वीटची खासियत लोकांना चांगली, उत्तम दर्जाची मिठाई विक्री करणे हीच राहिली आहे. मिठाईचा दर्जा आंम्ही कायम उत्तम ठेवला आहे. यामुळे जसलोक स्वीटवर लोकांचा विश्वास कायम असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मुकेश चौधरी, सिताराम चौधरी, दलाराम चौधरी, मोहन चौधरी, सखाराम देवाशी, मनोहर चौधरी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta