अंमणगी-मुगळी रस्त्यावर अपघात
संकेश्वर (महंमद मोमीन) : अंमणगी-मुगळी रस्त्यावर आज सायंकाळी ५ वाजता भरधाव टिप्परने बकऱ्यांना चिरडून झालेल्या अपघातात सर्व ५४ बकरी दगावले आहेत. अपघाताची पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी अंमणगी-मुगळी येथे बकरी चारवून घराकडे परतणाऱ्या हालप्पा हेगडे, लगमण्णा हेगडे यांच्या कळपातील बकऱ्यांना अंमणगीहून मुगळीकडे भरवेगात निघालेल्या टिप्पर क्रमांक केए ३२/ सी-३८४८ वाहनांने चिरडल्यांने ५४ बकरी गतप्राण झाल्या आहेत. टिप्परचे ब्रेक फेल झाल्याने चालकाचा वाहनावरील ताबा सुटून हा अपघात घडला आहे. अंमगणी-मुगळी रस्त्यावर बकरी मृतावस्थेत रक्तबंबाळ होऊन पडलेले ह्रदयद्रावक चित्र पहावयास मिळाले. अपघातात हालप्पा हेगडे लगमण्णा हेगडे यांच्या बकरी दगावल्याने लोकांतून हळहळ व्यक्त केली जात आहे. अपघाताची माहिती मिळताच संकेश्वर पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गणपती कोगनोळी, एएसआय ए. एल. बजंत्री, पोलिस कर्मचारी एम. एम. जंबगी, चिंचेवाडी यांनी धाव घेऊन पंचनामा केला आहे. संकेश्वर पोलिसांत अपघाताची नोंद करण्यात आली आहे. अंमणगी-मुगळी रस्त्यावरील उतारावर (डाऊनलवर) टिप्परचे ब्रेक निकामी झाल्यामुळे चालकाचा वाहनावरील ताबा सुटून अपघात घडल्याचे सांगितले जात आहे.