संकेश्वर (महंमद मोमीन) : पालिका सभेत प्रभाग क्रमांक 13 चे नूतन नगरसेवक नंदू मुडशी यांचे सहर्ष स्वागत नगराध्यक्षा सौ. सीमाताई हतनुरी, उपनगराध्यक्ष अजित करजगी, सभापती सुनिल पर्वतराव यांनी पुष्पगुच्छ देऊन केले. यावेळी नंदू मुडशी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना सभापती सुनिल पर्वतराव म्हणाले, नंदू मुडशी हे प्रभागातील विकासकामांसाठी झटणारे धडाडीचे नगरसेवक आहेत. मुख्याधिकारींनी त्यांच्या विकासकामांना प्राधान्य देऊन सहकार्य करण्याविषयी सांगितले. पालिकेतील विरोधी गटाचे नगरसेवक जितेंद्र मरडी म्हणाले, नंदू मुडशी हे नवखे सदस्य आहेत. प्रभागातील विकास कामे करण्यासाठी ते उत्सूक आहेत. त्यांची विकास कामे मुख्याधिकारींनी करण्याची मागणी काॅंग्रेस सदस्यांच्या गटाकडून आपण करीत असल्याचे सांगितले. माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक अमर नलवडे, संजय शिरकोळी, डॉ. जयप्रकाश करजगी यांनी नंदू मुडशी यांना शुभेच्छा प्रदान केल्या. मुख्याधिकारी आर. सी. चौगुला, अभियंता आर. बी. गडाद यांनी नंदू मुडशी यांचे स्वागत केले. यावेळी नगरसेविका मनोरमा सुगते, सुचिता परीट, श्रीविद्या बांबरे,शेवंता कब्बूरी, महादेवी संसुध्दी, रिजवाना रामपूरे, संगिता कोळी, नगरसेवक विवेक क्वळी, सचिन भोपळे, रोहण नेसरी, विनोद नाईक, चिदानंद कर्देण्णावर सत्तारुढ आणि विरोधी गटाचे नगरसेवक उपस्थित होते. नगरसेवक नंदू मुडशी यांनी सर्व सदस्यांचे मनःपूर्वक आभार मानले.
Check Also
हरगापूरगड (ता. हुक्केरी) ग्राम पंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष बिनविरोध
Spread the love हुक्केरी : हरगापूरगड (ता. हुक्केरी) येथील ग्राम पंचायत अध्यक्ष व उपाध्यक्ष पदी …